‘रोटाव्हायरस’वरील लशीला पूर्वपरवानगी

भारत बायोटेक कंपनीचे यश
rotavirus
rotavirussakal

पुणे : दूषित पाणी आणि अन्नामुळे लहान मुलांना ‘रोटाव्हायरस’ या आजाराची लागण झाल्याचे पाहायला मिळते. उलट्या आणि जुलाबासारखी लक्षणे असलेल्या हा आजार संसर्गजन्य असून, याच्या प्रतिबंधासाठी लसीकरण केले जाते. ‘भारत बायोटेक’च्या (bharat biotech) अशाच एका ‘रोटाव्हायरस’च्या (Rotavirus) लसीला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पूर्व परवानगी दिली आहे. (World Health Organization Pre approval of bharat biotech rotavirus vaccine)

जागतिक स्तरावर लहान मुलांच्या लशीसंबंधी सुरक्षिततेची आणि दर्जाची मानक निश्चित केली आहे. ती सर्व ‘रोटाव्हॅक ५ डी’ या लसीने पूर्ण केली आहेत. या संबंधी कंपनीच्या सहव्यवस्थापकीय संचालक सुचेत्रा इला म्हणाल्या, ‘‘रोटाव्हायरस लशीवरील संशोधन आणि निर्मितीत गेल्या तीस वर्षांपासून कंपनी कार्यरत आहे. रोटाव्हारस रोग प्रतिबंधात्मक मोहिमेत हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. जागतिक स्तरावरील सहकाऱ्यांच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे.’’

लहान मुलांसाठी विकसित केलेल्या या लसीमुळे जैववैद्यकीय कचरा तर वाचेल, त्याचबरोबर तिचे व्यवस्थापन करणेही सुलभ जाणार आहे. जीवरक्षक लस म्हणून या लसीचा जागतिक स्तरावरील प्रवास आता सुलभ झाल्याचेही त्यांनी सांगितले.

rotavirus
पानशेत धरण १०० टक्के भरले

‘रोटाव्हॅक ५ डी’ची वैशिष्ट्ये...

  • २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानाला साठवता येते

  • एक मात्रा ०.५ मिलिलिटरची

  • तोंडावाटे पाच थेंबांची मात्रा दिली जाते

  • एक मात्रा, द्विमात्रा आणि बहुमात्रा प्रकारांत उपलब्ध

  • साठवण आणि वाहतूक सहज करता येते

  • ‘रोटाव्हायरस’च्या सर्व व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचा कंपनीचा दावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com