सह्याद्रीतील वन्यजीवांचे विश्‍व उलगडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

पुणे - अरबी समुद्राच्या किनारपट्टीला १६०० किलोमीटरपर्यंत समांतर असलेला आपला पश्‍चिम घाट म्हणजे जैवविविधतेची श्रीमंती लाभलेला भाग. गुजरातपासून ते केरळपर्यंत पसरलेला हा पश्‍चिम घाट ज्याला आपण अभिमानाने सह्याद्री म्हणतो, यातील वन्यजीवांचे विश्‍व पुणेकरांसमोर उलगडले. 

निमित्त होते ते पुण्यात सुरू असलेल्या पहिल्या वहिल्या ‘वाइल्ड लाइफ फिल्म फेस्टिव्हल’चे! गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला चित्रपट महोत्सव शनिवारपर्यंत (ता. ११) सुरू राहणार आहे. त्यात सोमवारी संध्याकाळी ‘लाइफ फोर्स - इंडियाज वेस्टर्न घाट्‌स’ हा वन्यजीव माहितीपटकार नल्ला मृत्थू यांची निर्मिती असलेला माहितीपट दाखविला. पश्‍चिम घाटाच्या श्रीमंतीचे चित्रण यात दाखविण्यात आला आहे. त्याला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सह्याद्रीतील रुबाबदार वाघ, बिबट्या, मोर, माकड यासह असंख्य वन्यजीवांचे बारकाईने चित्रण या माहितीपटात केले आहे. 

‘द फ्लाइंग रेनबो’ या दुसऱ्या माहितीपटातून विशाल जाधव यांनी तिबेटी खंड्या या देखण्या पक्ष्याच्या जीवनावर प्रकाश टाकला आहे. खंड्याच्या एका कुटुंबाचा सलग सहा वर्षांचा प्रवास यात दाखविला आहे. या बोलताना जाधव म्हणाले, ‘‘या माहितीपटाचे चित्रीकरण मॉन्सूनमध्ये करण्यात आले आहे. मुळशीच्या परिसरात या माहितीपट चित्रित केला आहे.’’

Web Title: The World of Sahyadri Wild Animal life