जगभरात वाढतेय अस्वस्थता - रजिया पटेल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

पुणे - ""अमेरिकेत ट्रम्प निवडून आले. आपल्याकडेही तशाच विचारधारेची माणसे सत्तेवर आहेत. सगळीकडे कट्टरता प्रबळ होत चालली आहे. त्यामुळे जगभरात अस्वस्थता वाढताना दिसत आहे,'' अशी खंत सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल यांनी रविवारी व्यक्त केली. 

साधना प्रकाशनतर्फे आयोजित समारंभात हमीद दलवाई यांच्या "भारतातील मुस्लिम राजकारण' आणि इतिहास संशोधक रामचंद्र गुहा यांच्या "कालपरवा' या पुस्तकांचे प्रकाशन न्यायमूर्ती हेमंत गोखले यांच्या हस्ते झाले. या वेळी पटेल बोलत होत्या. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, मेहरुणीसा दलवाई, "साधना'चे विश्‍वस्त डॉ. हमीद दाभोलकर उपस्थित होते. 

पटेल म्हणाल्या, ""सध्याचा काळ हा प्रचंड उलथापालथीचा आहे. या काळात प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायला हवे.'' 

केतकर म्हणाले, ""देशात मुस्लिमविरोधी वातावरण तयार झाले आहे. दलवाईच्या काळातही मुस्लिमांबद्दल द्वेष होता; पण आता हा द्वेष अधिक उग्र झाला आहे. त्याचे परिणाम मुस्लिम राजकारणावरच नाही, तर सबंध समाजावर होत आहेत, याचा विचार होत नाही.'' 

गोखले म्हणाले, ""दलवाई यांचे तत्त्वज्ञान, त्यांची मते स्पष्ट होती. आयुष्यभर त्यांनी ती जपली. एकमेकांना जोडण्याचा त्यांचा व्यापक विचार होता. तो आपण समजून घ्यायला हवा.'' गुहा यांनी पुण्याशी असलेल्या संबंधांना उजाळा दिला.  "साधना'चे संपादक विनोद शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: The world is still growing discomfort - Razia Patel