चार महिन्यांचे अंतर आता एका महिन्यावर... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

पुणे -: ""सुरवातीला ज्यांच्याशी एखादा शब्द कसा बोलायचा, हेदेखील माहिती नव्हतं, अशा मूकबधिर मुलांना नृत्य शिकविणे ही खूपच अवघड गोष्ट होती. केवळ चार मिनिटांचं गाणं बसवायला चार महिने लागायचे; मात्र हळूहळू नजरेच्या, स्पर्शाच्या माध्यमातून त्यांच्याशी सूर जुळत गेले आणि त्यांना शिकविण्याचे त्या चार महिन्यांचे अंतर आता एक महिन्यावर आले,'' अशा शब्दांत कथक नृत्यांगना शिल्पा दातार यांनी त्यांच्या विविध आठवणींना रविवारी उजाळा दिला. 

"वर्ल्ड स्टोरीटेलिंग डे'च्या निमित्ताने भारतीय कथाकथनाच्या विविध शैलींची ओळख करून देण्यासाठी आयोजित तोषल गांधी आणि मधुरा आफळे यांच्या "सूत्रधार-अ मिलियन स्टोरीज टू टेल' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कथक नृत्यांगना मनीषा साठे उपस्थित होत्या. "ब्ली टेक इनोव्हेशन'च्या जानवी जोशी आणि नुपूर किर्लोस्कर यांनी कर्णबधिर मुलांसाठी बनवित असलेल्या उपकरणांची माहिती दिली. 

दातार म्हणाल्या, ""व्यक्त होण्याची विविध माध्यमे असतात. मग ती भाषा असो, की हावभाव असो किंवा नृत्य. यापलीकडे नजरेतून व्यक्त होणे हेदेखील एक महत्त्वाचे मध्यम आहे. मूकबधिर मुलांना नृत्य शिकवताना हेच माध्यम खूप महत्त्वाचे ठरले; परंतु तरीही काही वेळा हे काम खूप अवघड वाटायचे. त्या वेळी मनीषा साठे यांनी "आधी लोकनृत्यापासून सुरवात कर' असा सल्ला दिला होता. त्याचा खूप उपयोग झाला. आज जेव्हा त्या मुलांना सर्वसामान्य मुलांबरोबर तेवढ्याच चांगल्या दर्जाचे नृत्य करताना पाहते, त्या वेळी एक चांगली गोष्ट साध्य झाल्याचे समाधान मिळते.'' 

कार्यक्रमात नताशा पूनावाला, वल्लरी आपटे, तोषल आणि मधुरा यांनी "कीर्तन' या पारंपरिक कथा शैलीवर आधारित नृत्याचे सादरीकरणही केले. 

Web Title: World storytelling day