ज्ञानसागर गुरुकुल मध्ये जागतिक योग दिन साजरा

संतोष आटोळे
शुक्रवार, 22 जून 2018

शिर्सुफळ - जागतिक योग दिनाचे औचित्य साधुन बारामती तालुक्यातील सावळ येथील ज्ञानसागर गुरुकुल मध्ये योग दिन साजरा करण्यात आला.यावेळी  विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व सांगण्यात आले.

शिर्सुफळ - जागतिक योग दिनाचे औचित्य साधुन बारामती तालुक्यातील सावळ येथील ज्ञानसागर गुरुकुल मध्ये योग दिन साजरा करण्यात आला.यावेळी  विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व सांगण्यात आले.

यावेळी शारीरिक शिक्षणाचे शिक्षक सागर लाड  यांनी योगा करण्याचे फायदे सांगून विद्यार्थ्यांना कपालभारती प्राणायाम, अनुलोम विलोम, नाडीशोधन, भ्रामरी, वृक्षासन, वज्रासन, अर्धचक्रासन इत्यादी योगा करण्याचे प्रकार शिकवण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर आटोळे म्हणाले, शरीराबरोबरच मनाचे आरोग्य सदृढ व्हावे यासह मानसिक चैतन्य, प्रबळ इच्छाशक्ती, स्वतःचा शोध घेता यावा यासाठी योग साधना केली जाते. 21 व्या शतकात माणूस भौतिक सुख सुविधा मागे धावत आहे . या धावपळी मध्ये त्यांचे मानसिक आणि शाररिक आरोग्य ढासळत आहे. प्राचीन काळापासून वैदिक परंपरेनुसार भारतात होत असलेल्या योगाभ्यासाची गरज व्यक्त केली.

यावेळी प्रा. सागर आटोळे यांच्यासह संस्थेच्या उपाध्यक्षा रेश्मा गावडे, सेक्रेटरी मानसिंग आटोळे , अल्का आटोळे , पल्लवी सांगळे , दिपक बिबे , दत्तात्रय शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.

Web Title: World Yog day celebrated in GyanSagar Gurukul