#WorldPhotographyDay वाईल्ड आणि फाईन आर्टस् छायाचित्रकार शिक्षक : समीर मनियार

राजशेखर चौधरी
रविवार, 19 ऑगस्ट 2018

अक्कलकोट : अक्कलकोट शहरातील काशीराया काका पाटील विद्यालयात गणित विषयाचे गेल्या २२ वर्ष्यापासून धडे देत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे शिक्षक, निसर्गाचा अविष्कार आपल्या कॅमेऱ्यात टिपणारे व 'फोटोग्राफी इज माय पॅशन' असं म्हणणारे वाईल्ड फोटोग्राफर, निसर्गावर मनापासून प्रेम करणारे निसर्गप्रेमी शिक्षक समीर मनियार यांच्या छायाचित्रण छंदाविषयी थोडेशे.समीर मनियारांनी शाळेतल्या अभ्यासक्रमाबरोबरच पर्यावरण संवर्धन, निसर्गातील जैवविविधता, व्यसनमुक्ती, ट्रेकिंग, पर्यटन, संगीत, फोटोग्राफी, सुविचार संग्रह असे विषय विद्यार्थ्यांवर बिंबविण्याचं महत्वपूर्ण कार्य हाती घेतलं आहे.

अक्कलकोट : अक्कलकोट शहरातील काशीराया काका पाटील विद्यालयात गणित विषयाचे गेल्या २२ वर्ष्यापासून धडे देत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे शिक्षक, निसर्गाचा अविष्कार आपल्या कॅमेऱ्यात टिपणारे व 'फोटोग्राफी इज माय पॅशन' असं म्हणणारे वाईल्ड फोटोग्राफर, निसर्गावर मनापासून प्रेम करणारे निसर्गप्रेमी शिक्षक समीर मनियार यांच्या छायाचित्रण छंदाविषयी थोडेशे.समीर मनियारांनी शाळेतल्या अभ्यासक्रमाबरोबरच पर्यावरण संवर्धन, निसर्गातील जैवविविधता, व्यसनमुक्ती, ट्रेकिंग, पर्यटन, संगीत, फोटोग्राफी, सुविचार संग्रह असे विषय विद्यार्थ्यांवर बिंबविण्याचं महत्वपूर्ण कार्य हाती घेतलं आहे. Image may contain: outdoor

विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्याचं त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे. स्वतः व्यसनापासून दूर राहून विद्यार्थ्यांना यापासून दूर राहण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करतात. या मोहिमेमध्ये  विद्यार्थ्यांचं खूप मोठं सहकार्य त्यांना नेहमीच मिळतं, असं त्यांचं म्हणणं आहे. पर्यावरणावर कार्यरत असताना वाईल्ड फोटोग्राफीची आवड निर्माण झाली आणि आज ते प्रसिद्ध वाईल्ड फोटोग्राफर म्हणून परिचीत आहेत. पुण्याचे श्री केदार भट यांच्याकडून फोटोग्राफीचे मूलभूत प्रशिक्षण घेतल्यानंतर बेंगलोरचे श्री सुधीर शिवराम यांच्याकडून वाईल्ड-लाईफ आणि विशाखापट्टणमचे श्री बिजय कुमार अग्रवाल यांच्याकडून फाईन आर्टस् फोटोग्राफीचे धडे आत्मसात केले. ज्यांच्याकडून आपण एखादी कला शिकतो किंवा एखादा विषय घेतो, त्यांच्याविषयी आपण नेहमीच कृतज्ञ राहिले पाहिजे.Image may contain: bird

आजही समीर मनियार हे आपल्या फोटोग्राफी गुरूंना स्मरतात, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. फोटोग्राफीची आवड जोपासण्यासाठी, फोटोग्राफीचा छंद चोहोबाजूनी फुलविण्यासाठी समीर मनियार यांनी प्रचंड भटकंती केली आहे. भिगवण, ताडोबा अभियारण्य-चंद्रपूर, सातपुडा-मध्यप्रदेश, कबिनी, दांडेली जंगल-कर्नाटक, भगवान महावीर अभयारण्य-गोवा या आणि अशा अनेक ठिकाणी त्यांनी फोटोग्राफी केलीय. "निसर्गाने बहाल केलेल्या अमाप सौंदर्याचे दर्शन आपल्या विद्यार्थ्यांना घडवणे" हा अतिशय महत्वाचा उद्देश त्यांच्या फोटोग्राफीचा आहे, असे त्यांचे मत आहे. अक्कलकोट येथील त्यांच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी निसर्ग छायाचित्रांचे प्रदर्शनही भरवले होते.

sky, tree and outdoor

इको फ्रेंडली क्लबच्या माध्यमातून एस.आर.पी. कॅम्प सोरेगाव येथे एन.सी.सी.च्या सुमारे पाचशे विद्यार्थ्यांसाठी "नाते निसर्गाशी" या विषयावरच्या व्याख्यानाचे आयोजन करून सुमारे २०० वृक्ष लागवडीचा कृतिशील उपक्रम सरांनी राबवला. गणित विषयाचे समीर मनियार हे 'एनसीसी ऑफिसर' म्हणून देखील कार्यरत आहेत. एनसीसीच्या माध्यमातून मनियार यांचे पाच गरीब कुटुंबातले विद्यार्थी भारतीय सेनेत आहेत. यापुढे या छायाचित्रण छंदातून आणखी प्रगती करत स्वतः आनंद घेत इतरांनाही सतत आनंदी ठेवण्याचा प्रयत्नात असल्याचे समीर मनियार म्हणाले.

Web Title: #WorldPhotographyDay Wild and Fine Arts Photographer Teacher Sameer Maniyar