एसपीज्‌ बिर्याणीमध्ये ग्राहकाच्या बिर्याणीमध्ये सापडली आळी 

दिगंबर पाटोळे
रविवार, 2 जून 2019

पुणे : नामांकीत बर्गरकिंगच्या बर्गरमध्ये काचेचे तुकडे निघण्याची घटना ताजी असतानाच रविवारी खास बिर्याणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या एसपीज्‌ बिर्याणी हाऊसमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या एका ग्राहकाच्या बिर्याणीमध्ये आळी निघाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याबाबत जाब विचारताना तेथे दाखल झालेल्या बाऊन्सरसमोर कर्मचाऱ्यांनी ग्राहकासमवेत उद्धट वर्तन करीत दमबाजी केली. 

उत्पादनशुल्क सल्लागार विरेंद्रसिंग ठाकूर हे त्यांच्या मुलासमवेत रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास टिळक रस्त्यावरील एसपीज्‌ बिर्याणी हाऊस या हॉटेलमध्ये बिर्याणी खाण्यासाठी गेले होते. त्यांनी बिर्याणी ऑर्डर केली. थोड्यावेळाने बिर्याणी आल्यानंतर ठाकूर व त्यांच्या मुलाने बिर्याणी खाण्यास सुरवात केली. दरम्यान, मुलाला बिर्याणीमध्ये आळी आढळून आली. त्यामुळे ठाकुर यांनी हा प्रकार हॉटेलच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी उद्धट वर्तन केले. 

या प्रकाराविषयी ठाकूर म्हणाले, " बिर्याणीमध्ये आळी निघाली, हे मी कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यानंतर मोबाईलवर आळीचे चित्रीकरण करत होतो. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी माझा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. आमचे बोलणे सुरु असतानाच तेथे बाऊन्सर आले. या प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार करु, असे मी कर्मचाऱ्यांना बजावले. त्यावेळी त्यांनी "कोणाकडे जायचेय त्यांच्याकडे जा, आमचे कोणी काही बिघडवू शकत नाही' अशा शब्दात धमकी दिली. हॉटेल कोणाचेही असू द्यात, आम्ही आळ्या खाण्यासाठी पैसे देत नाहीत. या प्रकाराबाबत सोमवारी अन्न व औषध निरीक्षकांकडे तक्रार करणार आहोत.'' 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Worm found in the customer's biryani in SPZ Bariyani