कर्वेनगरमध्ये पुजल्या जाणाऱ्या शिळेसंदर्भात समोर आली महत्त्वाची माहिती

Worship of Gadhegal as a deity in front of Tathawade garden in Karve Nagar
Worship of Gadhegal as a deity in front of Tathawade garden in Karve Nagar

कोथरूड : कर्वेनगरमधील हुतात्मा मेजर ताथवडे बागेसमोरच्या गल्लीमध्ये असलेल्या मधुसंचय गणपती मंदिराजवळ असलेली शिळा वीरगळ दैवत म्हणून पुजली जाते, परंतु ही शिळा वीरगळ नव्हे तर ‘गद्धेगळ’ असल्याची माहिती भारत इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य व स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानचे मंगेश नवघणे यांनी सांगितले. ही गद्धेगळ तीन कप्प्यांत आहे. मोक्ष प्राप्तीचे प्रतीक असलेला कलश, चंद्र आणि सूर्य असेपर्यंत ही शापवाणी राहील हे दर्शविण्यासाठी चंद्र आणि सूर्य आणि स्त्रीसमवेत समागम करणारे गाढव.

वीरांच्या स्मृतिप्रित्यर्थ बनवलेले वीरगळ, सती स्मृती निमित्तच्या सती शिळा गावोगाव दिसतात, परंतु गाढव किंवा हत्तीबरोबर समागम करणारी स्री कोरलेले गध्देगळ वा हत्तीगळ क्वचितच दिसते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मंगेश नवघणे म्हणाले की, गद्धेगळ ही शापवाणी शिल्पे असून प्रजेवर वचक बसावी, सर्वांनी नियमांचे पालन करावे, गुन्हा करू नये, सीमेचा भंग करू नये, दानाचा अपहार करू नये यासाठी ही शिल्पे उभारली जायची. ‘आज्ञेचा भंग करणाऱ्या व्यक्तीस अथवा त्याच्या मातेस गद्धेगळवर सांगितलेली शिक्षा देण्यात येईल,’ अशी चेतावणी त्यावर कोरलेली असायची. ही शिल्पे मुख्यत्वे गावाच्या वेशीशेजारी, ग्रामदैवताच्या मंदिराजवळ आढळतात.

सरदार नावजी लखमाजी बलकवडे यांचा मुळशी तालुक्यातील पिंपरी घाट येथे फितुरांनी खून केला. तिथे ऐका मोठ्या दगडावर अशीच गध्देगळ आहे. त्यावर लिहिलेला मजकूर मात्र आता स्पष्ट दिसत नाही. घोड्यावर बसलेला एक वीर आणि त्याच्या समोर वाघ आहे. त्याला अजसुद्धा तेथील लोक ‘बलकवडेंचा दगड’ म्हणून संबोधतात. यावर चंद्र- सूर्य, त्यावर देवीचा मुखवटा कोरलेला आहे आणि त्याच्या खाली गाढव व स्त्रीच्या संकराचे कोरलेले शिल्प आहे.

पिंपरी-चिंचवड विजांच्या कडकडाटासह पाऊस; शहरवासियांची धांदल

नवव्या शतकात गद्धेगळ कोरण्यास प्रारंभ
इतिहास संशोधक व वीरगळांचे अभ्यासक अनिल दुधाणे यांच्या मते, शिलाहार तसेच यादव काळात गद्धेगळ कोरण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले आहे. देवगिरीच्या यादव राज्यकर्त्यांनी कोरलेल्या गद्धेगळवर बऱ्याच ठिकाणी ‘जो लोपि तेहाचि माये गाढऊ’ हे एकच वाक्य वापरल्याचे आढळून येते. इसवी सणाच्या नवव्या-दहाव्या शतकात गद्धेगळ कोरून त्यावर लेख लिहिण्यास सुरवात झालेली असावी. (अर्थात हे फक्त महाराष्ट्रापुरते सांगता येईल.) अहमदनगरच्या मशिदीत (निजामाच्या काळात, १५६५-६८) ‘जो कुणी मन्हा करिल त्याचे मापर गाढव’ असे म्हणत ही परंपरा बरीच पुढे (१६ व्या शतकापर्यंत) चालू ठेवली होती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com