सोनाई कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील पैलवानांचे कुस्ती स्पर्धेमध्ये यश

राजकुमार थोरात
बुधवार, 4 एप्रिल 2018

वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील सोनाई कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील पैलवानांनी नुकत्याच झालेल्या विविध कुस्ती स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे.

वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील सोनाई कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील पैलवानांनी नुकत्याच झालेल्या विविध कुस्ती स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे.

पुण्यामध्ये माऊली केसरी चषक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये सोनाई कुस्ती केंद्रातील संतोष जगताप या पैलवानाने खुल्या गटामध्ये प्रथम क्रंमाक मिळवून चांदीची गदा पटकावली. महाराष्ट्र केसरी चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये बाबू डोंबाळे याने तृतीय क्रंमाकाचे बक्षीस पटकावले. सदाम जमादार याने बार्शी येथे झालेल्या छत्रपती केसरी स्पर्धेमध्ये, योगेश जाधव याने ऑल इंडिया कुस्ती स्पर्धेमध्ये व संभाजी कदम याने युश खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेमध्ये यश मिळविले. सर्व पैलवानांचा पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी वस्ताद मारुती माळी, अनंता बोडके, समाधान कोकाटे उपस्थित होते. पैलवानांनी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये यश मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच आगामी काळामध्ये होण्याऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये यश मिळविण्यासाठी देखील प्रयत्न करावेत. आंतरराष्ट्रीय मॅटवरील कुस्ती स्पर्धेचे नियम बदलत असून, याची पैलवानांनी माहिती करुन नवीन नियमाप्रमाणे कुस्ती सराव करण्याची गरज असल्याचे माने यांनी सांगितले. यावेळी माने यांच्या हस्ते विजेत्या पैलवानांचा सत्कार करण्यात आला. 

Web Title: wrestling championship Sonai Wrestling Training Center