कुस्तीला बोलकं करणारा आवाज यंदा गायब

संपत मोरे
शनिवार, 22 डिसेंबर 2018

पुणे : 'ज्यांनी आपल्या पहाडी आवाजाने मुकी कुस्ती बोलकी केली' असे ज्यांचे वर्णन केले जाते त्या कुस्तीनिवेदक शंकर पुजारी यांना जालना येथील कुस्ती अधिवेशनाचे निमंत्रण दिले गेले नाही. त्यामुळे पुजारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'मला निमंत्रण नाही याचं दुःख आहेच पण नाराज न होता लाल मातीची सेवा करत रहायचे."असे ते म्हणाले.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोथळी गावच्या शंकर पुजारी यांनी महाराष्ट्रातील कुस्तीत थेट निवेदन करण्याची परंपरा सुरू केली. त्यांच्या अगोदर प्रतिसरकारचे कॅप्टन रामभाऊ लाड, बापुसाहेब राडे हे निवेदन करत. पुजारी यांनी "लाइव्ह कॉमेंट्री"सुरू केली.कुस्ती शौकिनाना पुजारी यांचे निवेदन आवडू लागले.त्यांच्या निवेदनामुळे काही पैलवानांना आर्थिक मदतही मिळाली आहे.

2005 पासून गेल्या वर्षीपर्यंत पुजारी महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेचे समालोचन करत होते पण यावर्षी त्यांना जालना येथील स्पर्धेचे निमंत्रण नाही. याबाबत पुजारी म्हणाले, "मला निमंत्रण मिळाले नाही याचे दुःख वाटते आहे. मला जालन्यातुन अनेक लोकांचे फोन आले 'तुम्ही का आला नाही?' त्यांना काय सांगू?" "मी कुस्तीची सेवा करणारा माणूस आहे.आयुष्यभर कुस्तीसाठीच जगणार. निमंत्रण नसल्याने दुःख झाले आहे."

Web Title: Wrestling commentator Shankar Pujari is not invited this year for Maharashtra Kesari at jalna