इंदापुरात होणार कुस्तीस्पर्धा

डॉ. संदेश शहा
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

इंदापूर - पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच येथील कै. पै. रंगनाथ मारकड क्रीडा व युवक मंडळाच्या वतीने दि. 
२५ ते २७ सप्टेंबर या कालावधीत मारकड कुस्ती केंद्रावर जिल्हास्तरीय शालेय शासकीय कुस्ती स्पर्धा सन २०१८ - १९ चे आयोजन करण्यात 
आल्याची माहिती कुस्तीकोच मारूती मारकड यांनी दिली.

श्री. मारकड पुढे म्हणाले, दि. २५ सप्टेंबर रोजी १४, १७, १९ वर्ष ग्रीकोरोमण प्रकारात प्रत्येकी १० वजनगटात ही स्पर्धा होणार आहे. 

दि. २६ सप्टेंबर रोजी १७ व १९ वर्ष गटातील मुलांच्या फ्रीस्टाईल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी आमदार दत्तात्रय भरणे आहेत.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष 
प्रदिप गारटकर, जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने, जिल्हा परिषद 
सदस्य अभिजित तांबिले, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदिप भोंडवे, कामधेनू सेवा परिवाराचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण आसबे उपस्थित रहाणार आहेत. दि. २७ सप्टेंबर रोजी १४, १७, १९ वर्ष मुलींच्या विविध १० वजन गटातील कुस्ती स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेचे उदघाटन अकलूज येथील ताराराणी महिला कुस्ती केंद्राच्या  संस्थापक अध्यक्षा सौ. शितलदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी तहसिलदार सोनाली मेटकरी आहेत. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून मैत्रिण ग्रुपच्या अध्यक्षा अनुराधा गारटकर, जिल्हा परिषद सदस्या वैशाली पाटील, नगरसेविका हेमलता माळूंजकर, मधुरा पवार, उषा स्वामी, राजश्री मखरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा रेहना मुलाणी उपस्थित रहाणार आहेत. या स्पर्धेत १३ तालुक्यातील तालुकास्तरावरील प्रथम क्रमांकाचे १३ कुस्तीगीर सहभागी होणार असून हे या स्पर्धेचे आकर्षण असल्याचे शेवटी मारकड यांनी सांगितले.

Web Title: Wrestling Competition in Indapur