इंदापूर - कळंबममध्ये रंगणार लाल मातीतील कुस्त्या

राजकुमार थोरात
सोमवार, 30 एप्रिल 2018

वालचंदनगर (पुणे) : कळंब (ता.इंदापूर) येथे फडतरे उद्योग समुहाच्या वतीने शनिवारी (ता. 5) लाल मातीतील कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन केले असून स्पर्धेमध्ये 250 पेक्षा जास्त कुस्ती स्पर्धा होणार असल्याची माहिती फडतरे उद्योग समुहाचे अध्यक्ष उत्तम फडतरे यांनी दिली.

वालचंदनगर (पुणे) : कळंब (ता.इंदापूर) येथे फडतरे उद्योग समुहाच्या वतीने शनिवारी (ता. 5) लाल मातीतील कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन केले असून स्पर्धेमध्ये 250 पेक्षा जास्त कुस्ती स्पर्धा होणार असल्याची माहिती फडतरे उद्योग समुहाचे अध्यक्ष उत्तम फडतरे यांनी दिली.

येथे कै.बाबासाहेब फडतरे-देशमुख यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य लाल मातीतील कुस्त्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेमध्ये प्रथम क्रंमाकाची कुस्ती माऊली जमदाडे (कोल्हापूर) व मनजितसिंह खत्री (पंजाब) यांच्यामध्ये होणार आहे.  दुसऱ्या क्रंमाकाची कुस्ती योगेश बोंबाळे (कोल्हापूर) व  अमितकुमार (दिल्ली) यांच्यामध्ये होणार आहे. याव्यरिक्त कार्तिक काटे  व पोपट घोडके,  कौतुक दाफळे व विजय धुमाळ, सुनिल शेवतकर व सिंकदर यांच्या प्रमुख  लाल मातीतील कुस्त्या होणार आहेत.

 या आखाड्यामध्ये महिलांच्या ही मॅटवरती कुस्त्या रंगणार असून यामध्ये अंकिता शिंदे (मुरगुड) व अस्मिता पाटील (पन्हाळा), वेदांतिका पवार (मुरगुड) व सायल दंडवते (कागल),शिवांजली शिंदे (मुरगुड) व दिव्या डावरे (पुणे), अनुष्का भाट ( मुरगुड) व अंजली पाटील (सांगली), नेहा चौगुले (सोलापूर) व अलिशा कांबळे (अहमदनगर), मेघना सोनुले (बेळगाव) व सोनम सरगर (नातेपुते) यांच्या ही कुस्त्या होणार आहेत. आज सोमवारी (ता.30) उत्तम फडतरे, वस्ताद नारायण देवकर, संदीप पानसरे,के.बी.गवळी,भारत रणमोडे यांनी मैदानाची पाहणी केली. 

या कुस्तीच्या मैदानामध्ये राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता राहुल आवारे यांना फडतरे उद्योग समुहाच्या वतील एक लाख रुपये बक्षीस देऊन नागरिक सत्कार करण्यात येणार आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये केलेल्या अनमोल कार्यामुळे पद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने यांचाही मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

Web Title: wrestling on red soil in indapur kalamb