नवाब मलिक यांनी मागितली अण्णा हजारे यांची लेखी माफी

letter.jpg
letter.jpg

पुणे : अण्णा हजारे यांच्या उपोषणाला सुरूवात झाल्यानंतर अण्णा हजारे यांच्या विषयी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी 'अण्णा हजारे हे संघ परिवाराकडून पैसे घेऊन उपोषणे करतात व वकीलांकडून पैसे घेऊन उपोषणाला बसतात' अशी बदनामीकारक व धादांत खोटी वक्तव्ये एका वृत्त चित्रवाहिनीवर चर्चा करताना केली. याविरोधात  नवाब मलिक यांना 2 फेब्रुवारीला अण्णा हजारे यांनी अॅड मिलिंद दत्तात्रय पवार यांच्यावतीने कायदेशीर नोटिस पाठवली होती.त्यानंतर नवाब मलिक यांनी अण्णा हजारे यांची लेखी माफी मागितली आहे. 

लोकपाल व लोकआयुक्ताच्या नियुक्तीचा कायदा संमत होऊनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे हे राळेगण सिध्दी येथे 30 जानेवारी पासुन बेमुदत अमरण उपोषणासाठी यादव बाबा मंदिरात बसले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून हजारे यांनी शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथ आयोगाची अंमलबजावणी व्हावी. लोकपाल कायद्याची अंमलबजावणी व्हावी, प्रत्येक राज्यात लोकायुक्त कायदा व्हावा, या मागण्यांकरीता तबल्ल ३८ वेळा पत्रव्यवहार केला. परंतु, पंतप्रधान मोदी यांनी हजारे यांच्या पत्रांकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबिले व हजारे यांच्या मागण्यांना उत्तर देण्याचे मोदींनी टाळले. 

अण्णा हजारे यांच्या उपोषणाला सुरूवात झाल्यानंतर अण्णा हजारे यांच्या विषयी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी 'अण्णा हजारे हे संघ परिवाराकडून पैसे घेऊन उपोषणे करतात व वकीलांकडून पैसे घेऊन उपोषणाला बसतात' अशी बदनामीकारक व धादांत खोटी वक्तव्ये एका वृत्त चित्रवाहिनीवर चर्चा करताना केली. त्यानंतर 1 फेब्रुवारीला तातडीने महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी ताबडतोब नवाब यांनी केलेल्या बदनामीकारक वक्तव्यांची अण्णा हजारे यांची माफी मागून दिलगीर व्यक्त केली होती. परंतु स्वतः नवाब मलिक यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्या विषयी कुठलाही खुलासा केलेला नव्हता. त्यामुळे ते वक्तव्य त्यांचे वैयक्तिक होते किंवा पक्षाचे होते, तसेच नवाब मलिक यांच्याकडे कुठलाही पुरावे नसताना धादांत खोटे व बदनामी कारक ती व्यक्तव्य होती. 

फक्त राजकीय फायदा डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक अण्णा हजारे यांच्या विषयी बदनामी करण्याचे उद्देशाने व अण्णांविषयी समाजात चुकीचा समज निर्माण व्हावा याकरीता नवाब मलिक यांनी वरील वक्तव्य केल्याने अण्णा हजारे यांनी त्यांचे वकील मिलींद दत्तात्रय पवार यांच्यावतीने नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. त्या नोटीशीची प्रत महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना देखील रजिस्टर्ड पोस्टाने पाठविली होती.

नवाब मलिक यांनी अॅड पवार यांना रजिस्टर्ड पत्राने उत्तर पाठवून दिलगीरी व्यक्त केली आहे. ''आपण वडीलधारी व्यक्ती असुन आपले मन दुखावल्याने मी देखील दिलगीरी व्यक्त करतो" असे लेखी उत्तर नवाब मलिक यांनी पाठविल्याने ''आपल्याला देखील पुढे या प्रकरणी कोणताही वाद वाढवायचा नाही.'', असे अण्णांनी अॅड पवार यांना सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com