चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे सहा जणांची चौकशी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

वैद्यकीय अधीक्षक, सर्जन, भूलतज्ज्ञ, स्टाफ नर्सवर दोषारोप
पिंपरी - उजव्या पायावर शस्त्रक्रिया करताना गुंतागुंत निर्माण झाली. त्याचे डॉक्‍टरांना योग्य निदान करता आले नाही. त्यामुळे बाळासाहेब देंडगे यांचा उजवा पाय कापावा लागला. याप्रकरणी वायसीएमच्या सहा जणांवर बी. जे. मेडिकलने दिलेल्या अहवालानंतर दोषारोप झाले. यामुळे त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

वायसीएमचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख, सर्जन डॉ. संजय पाडाळे, भूलतज्ज्ञ डॉ. राजेश गोरे, सिस्टर इनचार्ज हेडरीना जॉन, स्टाप नर्स वर्षा राऊत आणि जयश्री कुंभार अशी दोषारोप झालेल्यांची नावे आहेत.

बाळासाहेब देंडगे (रा. शिरूर) यांच्या डाव्या पायावर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात 4 सप्टेंबर 2009 रोजी यशस्वी शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर त्यांचा उजवा पाय दुखू लागला. त्यामुळे त्यांना 14 सप्टेंबर 2015 रोजी वायसीएममध्ये दाखल करून घेतले. 16 सप्टेंबर 2015 रोजी डॉ. मननसिंग यांनी देंडगे यांच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया केली तेव्हा गुंतागुंत निर्माण झाली. दरम्यान, डॉ. सिंग यांनी वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ. वांटे व डॉ. पाडाळे यांना ऑपरेशन थिएटरमध्ये बोलविले. मात्र, गुंतागुंतीचे निदान झाले नसल्याने डॉ. नूपुर सरकार यांना बोलावून प्रयत्न केला; परंतु शस्त्रक्रिया यशस्वी होऊनदेखील देंडगे यांचा उजवा पाय काढावा लागला.

या प्रकरणाची चौकशी करण्यास तज्ज्ञ समिती नेमली. यामध्ये बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील समितीच्या प्राथमिक चौकशी अहवालात शस्त्रक्रियेदरम्यान कामकाजात निष्काळजीपणा करणे, रुग्णसेवेच्या आद्यकर्तव्यात दाखविलेला हलगर्जीपणा व कर्तव्यात उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.

वैद्यकीयचे दोषारोपपत्र अद्याप नाही
बी. जे. मेडिकल कॉलेजचा अहवाल प्राप्त होऊन दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. मात्र, वैद्यकीय विभागाकडून खातेनिहाय चौकशीसाठी आवश्‍यक अहवाल प्राप्त झालेला नाही, अशी माहिती प्रशासन विभागाचे सहायक आयुक्‍त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिली.

Web Title: wrong surgery 6 inquiry pimpri