राष्ट्रवादी कॉंग्रेसला आणखी एक धक्का

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यशवंत भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश
पिंपरी - भारतीय जनता पक्षाने पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला आणखी एक मोठा धक्का दिला. राष्ट्रवादीच्या नॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे अध्यक्ष, माजी नगरसेवक यशवंत भोसले यांनी आज (शुक्रवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

भोसले हे माजी महापौर योगेश बहल यांचे कट्टर विरोधक समजले जातात. भोसले यांच्यामुळे संत तुकारामनगर-कासारवाडी प्रभागातून महापालिका निवडणुकीला बहल यांची नाकाबंदी करण्याची भाजपची खेळी आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने मोर्चेबांधणी चालविली आहे. भ्रष्टाचाराच्या विविध मुद्यांवरून भाजपने सत्ताधारी राष्ट्रवादीला सळो की पळो करून सोडले आहे. विठ्ठल-रुक्‍मिणी मूर्ती आणि गॅस शवदाहिनी खरेदीपासून ते किरकोळ साहित्य खरेदीपर्यंत कसा भ्रष्टाचार सुरू आहे, याचे पुरावेच भाजपने समोर आणले. आता राष्ट्रवादीतील काही मोहरे गळाला लागत असल्याने सत्ताधारी पक्षात अस्वस्थता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गेल्याच महिन्यात भोसरीमध्ये झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. आता हा दुसरा मोठा धक्का आहे. कामगार नेते म्हणून भोसले यांच्या अखत्यारित पावणेदोनशे कारखाने असून सुमारे 34 हजार कामगार सभासद आहेत. कामगार चळवळीतील एक लढावू नेतृत्व पक्षात आल्याने भाजपची या क्षेत्रातील बाजू भक्कम झाली आहे.

नागपूर येथे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. त्या वेळी आमदार लक्ष्मण जगताप, शहर सरचिटणीस सदाशिव खाडे, प्रमोद निसळ उपस्थित होते.

...म्हणून प्रवेश केला
"सकाळ'शी बोलताना यशवंत भोसले म्हणाले, 'महापालिकेतील 572 कंत्राटी कामगारांना फरकासह 17 कोटी रुपये द्यावेत, असा आदेश जानेवारी 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यासाठी आठ वर्षे न्यायालयीन लढाई लढलो, नेत्यांनाही वारंवार सांगितले. सर्वांनी दिशाभूल केली म्हणून आता न्यायालयीन बेअदबीचा दावा दाखल केला आणि सरळ भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धाडसी निर्णयांमुळे विश्‍वास वाटतो. कामगारांची ताकद काय आहे तो चमत्कार महापालिकेला दिसेल.''

Web Title: yashwant bhosale bjp entry