जयंत सावरकर यांना यशवंत-वेणू पुरस्कार 

Yashwant-Venu Award to Jayant Savarkar
Yashwant-Venu Award to Jayant Savarkar

पुणे - ""कृतज्ञ व कृतघ्न यांच्यातला फरक कळणे अवघड झालेल्या सध्याच्या काळात आत्मीयतेने नाट्यगृहाचा वर्धापन दिन साजरा करण्याचे हे उदाहरण वेगळेच म्हणावे लागेल,'' असे मत ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी व्यक्त केले. त्यांना व त्यांच्या पत्नी निर्मला सावरकर यांना "यशवंत- वेणू पुरस्कारा'ने गौरविण्यात आले. सत्काराला उत्तर देण्याआधी सावरकर यांनी रंगभूमी व प्रेक्षकांना दंडवत घालून कृतज्ञता व्यक्त केली, तेव्हा त्यांच्या शेजारी उभ्या निर्मलाताईंनीही अभिवादन केले. प्रेक्षकांनी भारावून उभे राहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करीत सावरकरांना मानवंदना दिली. 

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा विसावा वर्धापन दिन व जागतिक रंगकर्मी दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य राजेश पांडे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे संचालक संजय चोरडिया उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोथरूड शाखेतर्फे आयोजित कार्यक्रमात संगीत, काव्य, नकला, नाट्य आदी विविध कलाविष्कारांची बहार अनुभवता आली. सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. नाट्यगृह व्यवस्थापक सुनील मते, बाळू गायकवाड, नाट्य व्यवस्थापक सत्यजित धांडेकर, प्रवीण बर्वे, दीपक गुप्ते व धनंजय पूरकर उपस्थित होते. शीतल अत्रावलकर यांनी सरस्वतीवंदना सादर केली. 

या वेळी गफार मोमीन प्रस्तुत "सप्तरंग' ही संगीत मैफल रंगली. मोमीन यांच्यासह मकरंद पाटणकर, संदीप आगवेकर, गौरी कडुसकर, क्रिशा चिटणीस, शीतल म्हसकर व आरती कवठेकर यांनी मराठी-हिंदी गीते सादर केली. डॉ. कांचन मुसमडे व इशिता भागवत यांनी स्केटिंग आणि नृत्याचा मिलाफ घडवीत चकित केले. विश्‍वास पटवर्धन यांनी "स्वभाव राशींचे' हा एकपात्री नाट्याविष्कार घडवला. मनीष आपटे यांनी मैफलीचे निवेदन केले. समीर हंपी यांनी आभार मानले. 

घरातील वडीलधारा वाटणारा नटश्रेष्ठ  
नटश्रेष्ठ जयंत सावरकर म्हणाले, ""मी चित्रपट, मालिका व नाटकांमधून दुय्यम भूमिका करीत आले. मात्र अनेक प्रेक्षक मला सांगतात, की तुम्ही आम्हाला आमाच्या घरातलेच कुणी वडीलधारे वाटता.'' नट आहे हे अभिनयातून कळले पाहिजे, वागणुकीतून नव्हे; अशा कानपिचक्‍या त्यांनी नट असल्याचा अहंकार असलेल्या कित्येकांना दिल्या. यशवंतराव चव्हाण यांच्या कलासक्तीबद्दल त्यांनी किस्सेही या वेळी सांगितले. परमेश्‍वराने जर मला पुनर्जन्म दिलाच तर तो नट म्हणूनच द्यावा, असे मागणे त्यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com