जुन्नरमधील पारुंडे, वडज व धामणखेल येथील यात्रा रद्द

दत्ता म्हसकर
Thursday, 25 February 2021

पारुंडे (ता. जुन्नर) येथे परंपरेने माघ शुद्ध चतुर्दशीला (शुक्रवारी ता. २५) भरणारी श्री ब्रम्हनाथ देवस्थानची यात्रा यावर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे.

जुन्नर : पारुंडे (ता. जुन्नर) येथे परंपरेने माघ शुद्ध चतुर्दशीला (शुक्रवारी ता. २५) भरणारी श्री ब्रम्हनाथ देवस्थानची यात्रा यावर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे.

पूजा चव्हाण मृत्यू : दोघं कुठं गेले? घटनेनंतर दिली होती कबुली; चित्रा वाघ यांचा खुलासा

श्री क्षेत्र वडज व धामणखेल येथे  परंपरेने माघ पौर्णिमेला भरणारा श्री कुलस्वामी खंडेरायाचा यात्रोत्सव देखील रद्द करण्यात आला असून नियमित पूजा तसेच उत्सवाचे धार्मिक कार्यक्रम शासनाचे नियमांचे पालन करून पार पाडण्यात येणार आहेत.

जुन्नर पोलिस ठाण्यात तीनही देवस्थानचे विश्वस्त यांची बैठक झाली. यावेळी पारुंडे येथील राजेंद्र पवार, दगडू पवार, शंकर पवार व किरण पुंडे, वडजचे विजय चव्हाण, उल्हास चव्हाण, युवराज चव्हाण तसेच धामणखेलचे गबाजी कोंडे, शिवाजी वर्पे, पांडुरंग वर्पे, राम कोंडे उपस्थित होते.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण - पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद, तपास काढून घ्या 

पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी शासनाच्या सूचनांची माहिती दिली. यानंतर आम्ही सूचनांचे पालन करू तसेच यात्रोत्सव रद्द करत असल्याचे जाहीर केले आहे. यात्रा काळात मंदिर देवदर्शनासाठी बंद राहणार असल्याने भाविकांनी येऊ नये असे आवाहन करणारे फलक लावण्यात आले आहेत.

(संपादन : सागर डी. शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yatra at parunde, vadaj and dhamankhel canceled