वायसीएम बाल मानसोपचारतज्ज्ञाविना

पिंपरी - वायसीएम रुग्णालयातील बंद असलेले प्ले थेरपी कक्ष.
पिंपरी - वायसीएम रुग्णालयातील बंद असलेले प्ले थेरपी कक्ष.

पिंपरी - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) बाल मानसोपचार विभागात बालरोगतज्ज्ञ नाही. तसेच, ‘प्ले थेरपी कक्ष’ दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे चिमुकल्यांच्या थेरपीसाठी असलेली खेळणी वापराविना धूळ खात पडून आहेत. 

मुलांमध्ये आजाराचे प्रकार बदलेले आहेत. सोशल मीडियाचाही दुष्परिणाम मुलांवर होत आहे. मुलांच्या उपचार पद्धतीत बदल करण्यासाठी विविध अत्याधुनिक तपासण्या वायसीएम रुग्णालयात होत नाहीत. बाल मानसोपचार विभागात दिवसाआड वयोगट चार ते बारा वर्षांपर्यंतची चिमुकली उपचारांसाठी येत होते. थेरपीच्या माध्यमातून दोन ते तीन रुग्णांवर नियमित उपचार होत होते. सर्व खेळळ्यांचा वापर केला जात होता. यासाठी कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ भरले होते. यासाठी फिजिकल व ॲक्‍युपेशनल थेरपिस्ट नेमलेले होते. मुलांवर दीर्घकाळ उपचार पद्धती करून नैराश्‍यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न थेरपिस्ट करीत होते. मात्र, आता प्ले कक्षच नसल्याने अशा मुलांवर थेरपीचा वापर केला जात नाही. लहान मुलांवर औषधांचा थेट मारा करता येत नाही. अशावेळी विविध अत्याधुनिक थेरपीचा वापर करावा लागतो. त्यासाठी मुलांना वेळ देणे आवश्‍यक आहे. यासाठी या विभागांत स्वतंत्र मनुष्यबळ गरजेचे आहे.

‘पाळणाघर व प्ले कक्ष हवा’
लहान मुलांमध्ये एकलकोंडेपणा, सोशल मीडियाचा अतिरेक, लैगिंक छळ, नैराश्‍य यातून चिमुकल्यांचे गंभीर आजार समोर आले आहेत. त्यातून मुलांना बाहेर काढण्यासाठी विविध थेरपीची गरज आहे. मुलांचे मन रिझविण्यासाठी रुग्णालयात पाळणाघर व प्ले कक्ष आवश्‍यक आहे.

मुलांसाठी ठरावीक वेळ देण्यासाठी प्ले कक्षात डॉल हाउस, स्टडी टेबल, तसेच विविध रंगीबेरंगी चित्रे, विविध प्रकारचे गेम्स असणे आवश्‍यक आहे. लहान मुलांना पटकन बोलते करण्यासाठी या माध्यमांचा उपयोग केला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com