YCMOU बीएससी ॲग्री परीक्षेत ॲड राहुल पडवळ राज्यात प्रथम

सुवर्णपदक वयशवंतराव चव्हाण पुरस्कार देऊन सन्मान
YCMOU बीएससी ॲग्री परीक्षेत ॲड राहुल पडवळ राज्यात प्रथम

मंचर : नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने सन २०२१-२२ मध्ये घेण्यात आलेल्या बीएससी ॲग्री परीक्षेत मंचर (ता.आंबेगाव) येथील ॲड. राहुल प्रतापराव पडवळ यांचा राज्यात प्रथम क्रमांक आला. त्याबद्दल त्यांचा गुरुवारी (ता.२३) नाशिक येथे विद्यापीठाच्या प्रांगणात सुवर्णपदक, प्रमाणपत्र व यशवंतराव चव्हाण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

सह्याद्री ॲग्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे यांच्या हस्ते व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे (परभणी) कुलगुरू डॉ. इंद्रमणी, यशवतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत पाटिल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. ॲड. पडवळ यांनी "मातीचे आरोग्य व सेंद्रिय अन्नद्रव्य व्यवस्थापन" या विषयावर शोध - प्रबंध विद्यापीठाकडे सादर केला होता.

त्यात त्यांनी प्राचीन भारतीय शेतीचा उगम व प्रवास, रासायनिक खते व कीटकनाशकांचे मातीच्या व मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, मानवाच्या व मातीच्या आरोग्याचा असणारा परस्पर संबंध, हरितक्रांतीचे दुष्परिणाम, रासायनिक शेतीचे दुष्टचक्र, सेंद्रिय शेतीची गरज व भविष्यातील स्थान, सेंद्रिय शेती पुढील आव्हाने,

सेंद्रिय व जैविक खते तयार करण्याची पद्धत, सेंद्रिय पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन, सेंद्रिय व जैविक कीटकनाशन पद्धती आदी विषयांवर प्रकाश टाकला आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गोवर्धन उद्योग समूहाचे अध्यक्ष देवेंद्र शहा, तात्यासाहेब भुजबळ कृषी संकुलचे व्यवस्थापकीय संचालक बी.आर भुजबळ, प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड आदींनी पडवळ यांचे अभिनंदन केले.

“ॲड. राहुल पडवळ यांना बीएससी ॲग्री परीक्षेत पाच वर्षात एकूण तीन हजार ४०० गुणांपैकी तीन हजार पाच गुण (८८.३८ टक्के) मिळाले आहेत. सन २०१८-१९ मध्ये झालेल्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन परीक्षेत ॲड.पडवळ राज्यात प्रथम आले होते.विद्यापीठाच्या दोन्ही परीक्षांमध्ये राज्यात प्रथम येण्याचा बहुमान त्यांनी पटकावला आहे. त्यांनी विधी, कला, वाणिज्य, व्यवसाय व्यवस्थापन, पत्रकारिता आदी विषयातील पदव्या संपादन केल्या आहेत.”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com