यंदा ‘कट ऑफ’ गेल्या वर्षीप्रमाणेच

यंदा ‘कट ऑफ’ गेल्या वर्षीप्रमाणेच

पुणे - बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमासाठी तुम्ही प्रयत्न करतायं का! पण, तुम्हाला शहरातील ‘टॉप’ महाविद्यालयांमध्ये प्रवेश हवा असेल, तर गुणही तसेच असावे लागणार आहेत.

गेल्या वर्षीचा कट ऑफ पाहता, यंदाच्या ‘कट ऑफ’मध्ये फारसा फरक नसेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील पदवी अभ्यासक्रमासाठी तुम्हाला नामवंत महाविद्यालयात प्रवेश हवा असल्यास जवळपास ९० ते ७० टक्के गुण असणे अपेक्षित आहे.

बारावीच्या निकालानंतर आता शहरातील सर्वंच महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही सुरू असून, विद्यार्थ्यांची प्रवेशाची लगबग सुरू आहे.

येत्या काही दिवसांत महाविद्यालयांमधील प्रवेशाच्या याद्या जाहीर होईल; परंतु बारावीच्या निकालात गेल्या वर्षीच्या तुलनेत २.५३ टक्‍क्‍यांनी घट झाली असली, तरीही पदवी अभ्यासक्रमासाठी यंदाचे कट ऑफ हे मागील वर्षीच्या टक्केवारीच्या जवळपासच असतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी म्हणाले, ‘‘गेल्या वर्षी बीएचा कट ऑफ ९१.०८ टक्के होता; तर बीएस्सीचा ८९.०८ टक्के, बीएस्सी (मायक्रो बायलॉजी)- ९०.७७ टक्के, बीएस्सी (बायोटेक)- ९४ टक्के असा कट ऑफ होता. यंदाही कट ऑफ मागील वर्षाच्या टक्केवारीप्रमाणे किंवा अर्धा ते एक टक्‍क्‍याने मागे-पुढे असण्याची शक्‍यता आहे.’’

शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा कट ऑफ हा ७० ते ६२ टक्‍क्‍यांच्या दरम्यान असेल. गेल्या वर्षी बीएस्सी (कॉम्प्युटर सायन्स)-६० टक्के, बीएस्सी (ॲनिमेशन)-६२ टक्के, बीएस्सी (बायोटेक)- ७० टक्के असा कट ऑफ होता, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांनी दिली. 

सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील पदवी अभ्यासक्रमाचा गेल्या वर्षीचा कट ऑफ हा ८० टक्‍क्‍यांपुढे होता. बीएचा ८८ टक्के, बीएस्सीचा ८२ टक्के, बीकॉमचा ८८ टक्के असा कट ऑफ मागील वर्षी होता. यंदाही याचप्रमाणे कट ऑफ असण्याची शक्‍यता आहे.
 - डॉ. दिलीप शेठ, प्राचार्य, सर परशुरामभाऊ महाविद्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com