ज्येष्ठ अभिनेत्री,गायिका बी. जयश्री यांना 'तन्वीर सन्मान' जाहीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

पुणे  : रूपवेध प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या 'तन्वीर सन्मान' यंदा ज्येष्ठ अभिनेत्री, गायिका बी. जयश्री यांना जाहीर झाला आहे. तर, तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार दिग्दर्शक अतुल पेठे यांना जाहीर झाला आहे.

पुणे  : रूपवेध प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या 'तन्वीर सन्मान' यंदा ज्येष्ठ अभिनेत्री, गायिका बी. जयश्री यांना जाहीर झाला आहे. तर, 'तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार' दिग्दर्शक अतुल पेठे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते 9 डिसेंबरला कोथरूड येथील यशवंत चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी 6.30 ला होणार  आहे.

एक लाख रुपये सन्मानचिन्ह असे 'तन्वीर पुरस्कारा'चे स्वरूप असेल तर ३० हजार रुपये असे 'तन्वीर नाट्यधर्मी' पुरस्कराचे स्वरूप आहे. बी. जयश्री यांनी कन्नड रंगभूमीवर अनेक नाटके दिग्दर्शित केली आहेत. याशिवाय कन्नड चित्रपटातील अनेक अभिनेत्रीसाठी त्यांनी आवाज दिला आहे. केंद्र सरकारने त्यांना पद्मश्रीने सन्मानित केले आहे. 

Web Title: This year, senior actress, singer B. Announces 'Tanvir Samman' to Jayshree