सव्वापाचशे गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

येरवडा - एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल सव्वापाचशे गुन्हेगारांच्या मुसक्‍या येरवडा पोलिसांनी आवळल्या आहेत. प्रतिबंधक कारवाईअंतर्गत सहायक पोलिस आयुक्तांकडे सव्वाचारशे गुन्हेगारांचा, तर चार टोळ्यांसह वीस अट्टल गुन्हेगारांना तडीपार करण्याचा प्रस्ताव परिमंडळ चारच्या उपायुक्तांकडे दिल्याची माहिती येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिली. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

येरवडा पोलिस ठाण्यातील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई आहे. त्यामुळे येरवडा पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविणे पोलिसांना सोपे होणार आहे. या संदर्भात मोहिते म्हणाले, ""येरवड्यातील लहान-मोठ्या गुन्ह्यांतील 317 जणांवर कलम 107 अंतर्गत, तर कलम 110 अंतर्गत 93 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव सहायक पोलिस आयुक्तांकडे पाठविण्यात आले आहे, तर चार गुन्हेगार टोळ्यांसह 20 जणांवर तडीपारीचा प्रस्ताव पोलिस उपायुक्तांकडे पाठविण्यात आले आहे. काही दिवसांत तडीपार करण्यासाठी सव्वाशे गुन्हेगार रडारवर आहेत. 

यावर्षी येरवड्यात पाच जणांचा खून, अनेक गंभीर मारहाणीच्या घटना, 15 घरफोड्या, 30 ते 35 किरकोळ चोऱ्या, तर पन्नास ते साठ फसवणुकीचे गुन्हे घडले आहेत. गुन्हेगारी टोळ्यांमध्ये धुमश्‍चक्रीच्या घटना वारंवार घडत होत्या. त्यामुळे नवीन वर्षाच्या आधीच गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी येरवडा पोलिसांनी रणनीती आखली आहे. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये घबराट पसरली असून, अनेक जण पसार झाले आहेत. 

अनेक गुन्हेगार राजकीय मंडळीच्या आश्रयाला आहेत. पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक असल्यामुळे व एकाच वेळी पोलिसांनी सव्वापाचशे गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई केल्यामुळे सर्वच राजकीय नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. 

अवैध धद्यांवर वचक  
येरवडा परिसरात अनेक वर्षांपासून मटका, जुगार, पत्त्यांचा क्‍लब, हप्ता वसुली, धमकावणे, खंडणी मागणे, हातभट्टीचा व्यवसाय आदी अवैध धंदे सुरू आहेत. आता एकाचवेळी गुन्हेगारांवर केलेल्या कारवाईमुळे अनेक अवैध धंद्यांवर पोलिसांना नियंत्रण मिळविता येणार आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी एक सकारात्मक पाऊल असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Yerawada police have got rid of the criminals