कौटुंबिक हिंसाचार कायद्याचे पोलिसांनी घेतले धडे!

कौटुंबिक हिंसाचार कायद्याचे पोलिसांनी घेतले धडे!

येरवडा - कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या अंमलबजावणीत पोलिसांची महत्त्वाची भूमिका आहे. पीडित महिलेला घरात राहण्याचा अधिकार, मुलांचा ताबा, घर खर्चासाठी पैसे मिळण्याचा अधिकार असल्याची माहिती चेतना महिला विकास केंद्राच्या ऍड. असुंता पारधे यांनी दिली. 

येरवडा पोलिस ठाण्याच्या आवारात येरवडा, विमानतळ आणि चंदननगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना कौटुंबिक हिंसाचार कायद्याची माहिती देताना पारधे बोलत होत्या. यावेळी सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख, पंचशिला कांबळे उपस्थित होते. 

पारधे म्हणाल्या, ""शारीरिक, लैंगिक, आर्थिक, शाब्दिक अशा चार प्रकारच्या हिंसा असतात. अठरा वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुली यांनासुद्धा कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण आहे. कायद्यातील कलम सहा अंतर्गत पीडित महिला पतीच्या मारहाणीत जखमी झाल्यास डॉक्‍टरांचा लेखी अहवाल महत्त्वाचा असतो. '' 

व्यक्तीचे क्रोध व वर्तन नियंत्रण करण्याचे व्यवस्थापन आवश्‍यक आहे. पतीला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळणे आवश्‍यक असल्याचे पारधे यांनी सांगितले. 

महिला व बालकांना मदत करता येईल, अशी पोलिसांची भूमिका असणे आवश्‍यक असल्याचे जाधव यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com