मनोरुग्णालयाचा निधी परत जाणार?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

येरवडा - मनोरुग्णालयातील विविध विकासकामांसाठी केंद्र सरकारकडून गेल्या वर्षी दीड कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. मात्र रुग्णालय कर्मचारी वसाहतीची सीमाभिंत बांधण्यासाठी केवळ पन्नास लाख रुपये खर्च केले. उर्वरित जागेत अतिक्रमण झाल्यामुळे सीमाभिंत बांधता येत नाही. त्यामुळे एक कोटी रुपये परत जाण्याची शक्‍यता आहे. 

येरवडा - मनोरुग्णालयातील विविध विकासकामांसाठी केंद्र सरकारकडून गेल्या वर्षी दीड कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. मात्र रुग्णालय कर्मचारी वसाहतीची सीमाभिंत बांधण्यासाठी केवळ पन्नास लाख रुपये खर्च केले. उर्वरित जागेत अतिक्रमण झाल्यामुळे सीमाभिंत बांधता येत नाही. त्यामुळे एक कोटी रुपये परत जाण्याची शक्‍यता आहे. 

प्राधान्याने मनोरुग्णालयाच्या ताब्यातील जागेत नव्याने अतिक्रमण होऊ नये म्हणून सीमाभिंत बांधण्याचे ठरले. त्याप्रमाणे सीमाभिंत बांधण्यास केवळ पन्नास लाख रुपये खर्च झाले. तर उर्वरित वीस ते पंचवीस एकर जागेत राजीव गांधीनगरचे अतिक्रमण असल्याने या ठिकाणी सीमाभिंत बांधता 
येत नाही.  

सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता यू. व्ही. पुरी म्हणाले, ‘‘आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक साधना तायडे यांनी नुकतीच मनोरुग्णालय व कर्मचारी वसाहतीला भेट दिली असता, येथील अतिक्रमण त्यांच्या निदर्शनात आणून दिले. त्यांनी अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्रव्यवहार करण्यास सांगितले आहे. ३१ मार्च पूर्वी सीमाभिंतीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. मात्र अतिक्रमण असल्यामुळे भिंत बांधणार कुठे, असा प्रश्‍न आहे.’’

मनोरुग्णालय कर्मचारी वसाहतीची दुरवस्था 
मनोरुग्णालय कर्मचारी वसाहीतीची मोठी दुरवस्था झाली आहे. सांडपाणी वाहिन्यांचा अभाव, शंभर वर्षांपूर्वील घरांचे बांधकाम, स्वच्छतागृहांची दुरवस्था, पथदिवे नसल्यामुळे अंधाराचे साम्राज्य. त्यामुळे होणाऱ्या चोऱ्यांयामुळे कर्मचारी वैतागले आहे. ही कामे कधी होणार, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. सीमाभिंतीपेक्षा वसाहतींची कामे होणे अपेक्षित असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष
मनोरुग्णालयात १७०० रुग्ण आहेत. तर पुरुषांसाठी नऊ आणि महिलांसाठी सहा मोठे वॉर्ड आहेत. या वॉर्डातील तुटलेल्या फरश्‍या, रंगरंगोटी नाही, वीजवाहिन्या तुटलेल्या, दिवे, पंखे, गिझर आदींचा अभाव आहे. स्वच्छतागृहांची दुरवस्था आहे. अशा कामांवर निधी खर्च करण्यापेक्षा सीमाभिंतीवर कोट्यावधी रुपयांची तरतूद होते. हा निधी खर्च होत नाही म्हणून परत जातो, ही शोकांतिका असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. 

Web Title: yerwada news pune news Psychiatric hospital fund