बंड धरणाचे दरवाजे उघडेच !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

येरवडा - पुणे महापालिकेने जलसंपदाच्या यांत्रिक विभागाच्या वतीने ऐतिहासिक बंड धरणाला पाच स्वयंचलित दरवाजे बसविले आहेत. मात्र हे दरवाजे गेल्या दीड वर्षांत गणेशोत्सव वगळता बंद झालेच नाहीत. त्यामुळे तब्बल पंधरा कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या बंधाऱ्याचा उपयोग काय, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे.

येरवडा - पुणे महापालिकेने जलसंपदाच्या यांत्रिक विभागाच्या वतीने ऐतिहासिक बंड धरणाला पाच स्वयंचलित दरवाजे बसविले आहेत. मात्र हे दरवाजे गेल्या दीड वर्षांत गणेशोत्सव वगळता बंद झालेच नाहीत. त्यामुळे तब्बल पंधरा कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या बंधाऱ्याचा उपयोग काय, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे.

महापालिकेने काही वर्षांपूर्वी बंड धरणातील गाळ वाहून जाण्यासाठी धरणाला पाच ठिकाणी छेद दिले होते. त्यामुळे गेल्या काही पावसाळ्यात धरणातील गाळ वाहून जाण्यास मदत झाली होती. मात्र धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे शेजारी बोट क्‍लबच्या नौका विहाराला मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे बोट क्‍लबने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने धरणातील पाण्याची पातळी पूर्वत करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते.

त्याप्रमाणे महापालिकेने जलसंपदाच्या यांत्रिक विभागाच्या वतीने बंड धरणाला बंधारा बांधला. त्यामुळे पावसाळ्यात नदीकाठावर असणाऱ्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरण्याचे बंद झाले होते. या बंधाऱ्यावर थोपद्वार बसविण्याचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. बंधाऱ्यावरील दरवाजे उघडण्याचे किंवा बंद करण्याचे नियंत्रण जलसंपदाच्या यांत्रिक विभागाकडे असले तरी महापालिकेच्या मागणी प्रमाणे हे दरवाजे उघडले किंवा बंद केले जाऊ शकतात. याबाबत माजी शाखा अभियंता किरणकुमार जैयतकर म्हणाले, ‘‘या वर्षी गणेशोत्सवादरम्यान दोन ते तीन दिवस धरणाचे दरवाजे बंद केले होते. यासह पुणे अभियांत्रिक महाविद्यालयाच्या रिगाटा स्पर्धेला दरवाजे बंद केले होते.’’ नदीसुधार प्रकल्पाच्या माध्यमातून बंड धरणापासून ते संगमापर्यंत नदीच्या दोन्ही बाजूंना सुशोभीकरण, नदीकाठाची धूप होऊ नये म्हणून माती व दगडांचा थर, पद पथ, सांडपाणी वाहिन्या पूर्णत: बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात नदीमधून सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणीच वाहील असे नियोजन असल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगतात.

नौका विहाराला चालना 
मुळा-मुठा नदीमधील गाळ काढल्याने मोठ्या प्रमाणात पाण्यातील जैवविविधता निर्माण होऊ शकते. बंड बंधाऱ्यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढून नौका विहाराला चालना मिळू शकते. त्यामुळे महापालिका एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करून शकते. बंड धरणाचे पाच किलोमीटर अंतराचे विस्तर्ण पात्र असल्यामुळे नौका स्पर्धांसाठी उत्कृष्ट ठिकाण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title: yerwada pune news band dam door open