पुणे- महिलेच्या धाडसामुळे चोरीला गेलेले चाळीस हजार मिळाले परत 

दिलीप कुऱ्हाडे
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

येरवडा : रामवाडी येथील ‘बीआरटी’ बस थांब्यावर उतरलेल्या सारिका यांना पर्समधील चाळीस हजार रुपये चोरल्याचे लक्षात आले. सारिका यांनी क्षणाचाही विलंब न लावता दुचाकीधारकाला लिफ्ट मागून बसला गाठले. संशयीत महिलेने चाळीस हजार रुपये खाली टाकण्याच्या प्रयत्नात असताना सारिका यांनी महिला चोरट्यांना रंगेहात पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्या या धाडसाचे येरवडा पोलिसांनी कौतुक केले. 

सारिका सोनवणे (वय ३२, रा. सांताक्रुज, मुंबई) आई व आठ वर्षांच्या मुलीसह ‘बीआरटी’ बसने रामवाडी येथे मामाकडे निघाल्या होत्या. त्या बस मधून उतरत असताना दोन महिलांनी त्यांना दरवाजात अडविले. तर एका महिलेने त्यांच्या पर्समधील चाळीस हजार रूपये सफाईदारपणे चोरले. त्यांना पर्स ओढल्याची जाणिव झाली होती. मात्र बसमध्ये गर्दी असल्यामुळे त्या घाईगडबडीत खाली उतरल्या. बस थांब्यावर उतरल्यानंतर पर्सची चेन उघडी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बँगेत पाहिल्यानंतर चाळीस हजार रूपये नव्हते. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र त्यांनी हिम्मत करून मुलीला आईकडे दिले. त्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता नगर रस्त्याने वाघोलीकडे जाणाऱ्या एका दुचाकीधारकाला लिफ्ट मागितली. दुचाकीवरून त्यांनी वैकफिल्ड चाैकातील सिग्नलवर बसला गाठले. सारिका यांना पाहाताच संशयीत महिला घाबरल्या. त्यांच्यापैकी एकीने चाळीस हजार रूपयांचे बंडल खाली टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र सारिका यांनी त्या महिलेला पैसे खाली टाकताना रंगेहात पकडले. त्यांनी तिनही महिलांना बस चालक व वाहकाच्या मदतीने येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले. संशयीत महिलांच्या कडेवर तीन लहान मुले होती. या महिलांची व मुलांची चौकशी करीत असल्याचे येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांनी सांगितले.

Web Title: yerwada women caught thief in bus