पुणे, पिंपरी व जिल्ह्यात होणार ‘यिन’ची प्रतिनिधी निवड
पुणे - महाविद्यालयीन तरुणाईतील बुद्धिमत्ता व सर्जनशीलतेला वाव देऊन त्यांच्यात नेतृत्वगुण तयार करणाऱ्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या नेतृत्व विकास उपक्रमांतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील प्रतिनिधींची निवड प्रक्रिया गुरुवार (ता. ११) आणि शुक्रवारी (ता. १२) होणार आहे.

‘सकाळ माध्यम समूहा’ने महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’चे (यिन) व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ‘यिन’च्या याच व्यासपीठासाठी प्रतिनिधींच्या निवडीची महत्त्वपूर्ण प्रक्रिया या आठवड्यात होत आहे. त्यानुसार पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व पुणे ग्रामीण या ठिकाणीही प्रक्रिया पार पडणार आहे. तिन्ही ठिकाणी असलेल्या माध्यमिक विद्यालयांसह महाविद्यालयांमध्ये निवड प्रक्रिया होणार आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी या निवड प्रक्रियेत मतदान करू शकणार आहेत. मतदान करताना महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे बंधनकारक आहे. या निवड प्रक्रियेस महाविद्यालयांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या निवडीचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल.
गेली तीन वर्षे ‘यिन’ राज्यातील महाविद्यालयांमध्ये होत असलेल्या नेतृत्व विकास उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मंत्रिमंडळाची ओळख व त्याचे कामकाज बघायची संधी मिळते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सामाजिक व अन्य उपक्रमांमध्येही मदत होते.
अधिक माहितीसाठी संपर्क -
पुणे - ९०७५००७९५८,
पिंपरी - ९८८१५०४४९२.