यिन फेस्टची उद्यापासून धूम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

पुणे - संगीत, चित्रकला, गप्पा अन्‌ वैविध्यपूर्ण कलांचा आविष्कार असलेला तरुणाईचा ‘यिन फेस्ट’ येत्या शनिवारपासून (ता.२५) राज्यातील सहा शहरांमध्ये रंगणार आहे. ‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)’ने आयोजित केलेल्या या फेस्टमधील उपक्रमांमध्ये तरुणाईला सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

तरुणाईशी डिझाईन क्षेत्राविषयी संवाद साधणाऱ्या ‘यिन टॉक’ने या फेस्टची सुरुवात होणार आहे. या संवाद मालिकेत कोल्हापूर येथे शनिवारी (ता.२५) सकाळी पहिल्या कार्यक्रमात डिझाईन तज्ज्ञ ध्रुपद मिस्त्री आणि प्रशांत सुतार सहभागी होणार आहेत. कोल्हापूरनंतर नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद येथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये डिझाईन क्षेत्रातील विविध तज्ज्ञ सहभागी होतील.  

फेब्रुवारी २०१९ पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात संगीतविषयक ‘यिन सिंग’ आणि कलाविष्कार, ‘यिन आर्ट’ आणि ‘यिन ड्रॉ’ अशा चार सत्रांमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत.

यिन टॉक
‘डिझाईन क्षेत्रातील संधी आणि त्यातील बदलते प्रवाह’ या विषयावर ‘यिन टॉक’मध्ये गप्पा रंगणार आहेत. ध्रुपद मिस्त्री व प्रसाद सुतार यांच्यासह आदिती देव, मयुरी निकुंभ, ई. सुरेश, निवेदिता साबू, अजय पारगे, नितीन देसाई, करिष्मा सहानी, वसीम खान, जशिश कांबळी, वृषाली केकरे, भाग्यश्री पटवर्धन, अभिजीत बनसोड, सुहासिनी पॉल, संदीप पॉल, आयुष कासलीवाल, अंजली लवेकर आणि नरेंद्र घाटे यांच्यासारखे डिझाईन क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ गप्पांमध्ये सहभागी होणार आहेत. डिझाईन क्षेत्रातील विविध पैलूंवर ते बोलतील. या सहाही शहरांमध्ये हा उपक्रम प्रत्येकी दोन दिवस चालणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क - गणेश घोलप (८४५१८७१६६०) 
बंदेनवाज जातगर (७७०९६०५४६७)

Web Title: Yin Fest from tomorrow