"यिन'चे समर यूथ समिट आजपासून 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

पुणे  - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी "डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन) या युवा व्यासपीठाने आयोजित केलेल्या "यिन समर यूथ समिट'ला सोमवारी (ता. 28) सुरवात होत आहे. 

पुणे  - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी "डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन) या युवा व्यासपीठाने आयोजित केलेल्या "यिन समर यूथ समिट'ला सोमवारी (ता. 28) सुरवात होत आहे. 

युवकांना उद्योग, राजकारण, टीम बिल्डिंग, स्टार्टअप, खेळ, नवीन तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्‍तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी देताना भविष्यात शैक्षणिक संधीचा वेध या परिषदेतून घेतला जाणार आहे. तरुण पिढीला शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकासावर लक्ष केंद्रित करताना समाज व देशासाठी रचनात्मक काम उभे करण्यास प्रेरणा मिळावी, हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे. 

पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, विधिज्ञ उज्ज्वल निकम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ एन. एस. उमराणी, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर आणि स्पेक्‍ट्रम ऍकॅडमीचे संचालक सुनील पाटील यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे तीन दिवसांच्या परिषदेचे उद्‌घाटन होणार आहे. 

महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाचे अधीक्षक बालसिंग राजपूत यांचे "सायबर गुन्हे' या विषयावरील विशेष व्याख्यान सायंकाळी पाच वाजता होणार आहे. 

दहावीनंतरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी "यिन'च्या माध्यमातून या परिषदा होत आहेत. 

या परिषदांसाठी स्पेक्‍ट्रम ऍकॅडमी मुख्य प्रायोजक आहेत. पॉवर्ड बाय हॅशटॅग क्‍लोदिंग असणाऱ्या या समिटसाठी पिंपरी- चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी- चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सुहाना मसाले व अभी ग्रुप ऑफ कंपनीज्‌ सहप्रायोजक आहेत. 

* प्रवेश मोफत. 
* समिट किट आणि भोजन व्यवस्थेचा लाभ घ्यायचा असल्यास प्रतिव्यक्ती शुल्क रु. 300. 
* सहभाग प्रमाणपत्र. 
* स्थळ - बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता. 
* सकाळी 10 वाजता. 

Web Title: Yin Summer Youth Summit start today