बारामतीकरांना योग विद्या शिकण्याची संधी...

मिलिंद संगई
Friday, 19 June 2020

जागतिक योगदिनाचे औचित्य साधून सकाळ माध्यम समूह व जीवनविद्या योग आयुर्वेद फाउंडेशन यांच्या वतीने रविवारी (ता. 21) बारामतीत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

बारामती (पुणे) : जागतिक योगदिनाचे औचित्य साधून सकाळ माध्यम समूह व जीवनविद्या योग आयुर्वेद फाउंडेशन यांच्या वतीने रविवारी (ता. 21) बारामतीत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

ग्रामपंचायतींकडील थकबाकी मुद्रांकमुळे वसूल

योगदिनानिमित्त दरवर्षी सकाळ माध्यम समूह व जीवनविद्या योग आयुर्वेद फाउंडेशनच्या वतीने बारामतीत योग शिबिराचे आयोजन केले जाते. यंदाही ही परंपरा शासकीय नियमांचे पालन करून कायम ठेवली जाणार आहे. या योग शिबिरात निवडक 50 व्यक्तींनाच सहभागी करुन घेतले जाणार आहे. शारिरीक अंतर व सर्व नियम पाळून निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत हे शिबिर होणार आहे. बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरील चिराग गार्डन येथे येत्या रविवारी सकाळी सहा वाजता हे शिबिर होईल. बारामती येथील मंगल लॅबचे डॉ. पंकज गांधी हे या शिबिराचे प्रायोजक आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या शिबिरात योगाचार्य डॉ. नीलेश महाजन हे मार्गदर्शन करणार आहेत. ते गेली बारा वर्षे बारामती पंचक्रोशीमध्ये योगासनांचे मार्गदर्शन करीत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी योगासनांचे मार्गदर्शन केले आहे. आजवर 30 हजार जणांना त्यांनी योगासनांचे प्रशिक्षण दिले आहे. 

घाबरू नका, तुमच्यासाठी येथे नोकरी उपलब्ध आहे..

ऑनलाईन सहभागी होण्याची संधी 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना योग शिबिरात सहभागी होता येणार नसल्याने ऑनलाईन सहभागी होण्याची संधी डॉ. नीलेश महाजन यांनी उपलब्ध करुन दिली आहे. प्रथम येणा-यास प्राधान्य, या तत्त्वावर यात ऑनलाईन सहभागी होता येईल. त्यासाठी 96658 23103 या क्रमांकावर स्वतःचे नाव व्हॉटसअॅप केल्यानंतर त्याबाबतची लिंक मिळेल. या लिंकवर क्लिक करून या शिबिरात सहभागी होता येईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yoga camp next Sunday in Baramati