योगामुळे सर्व व्याधींपासून मुक्ती मिळते : माया चुत्तर

yoga.jpg
yoga.jpg

नवी सांगवी(पुणे) : "अन्नमय कोश, मनोमय, प्राणमय, विज्ञानमय कोशांवर योग काम करत असल्याने ते मनुष्याला सर्व व्याधींपासून मुक्त करते. त्यामुळे नुसते युवाच नाही तर वृध्द, अतिवृध्द, व्याधीग्रस्त, दुर्बल लोकही योग करू शकतात." , असे प्रतिपादन योगविद्या गुरूकुलच्या शिक्षिका माया चुत्तर यांनी पिंपळे सौदागर येथे केले.

उन्नती फाऊंडेशन, रोझलँण्ड रेसिडेन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने गोविंद गार्डन समोरील जी के गुरूकुल प्रशालेत आयोजित केलेल्या दोन दिवसीय योग विषयक कार्यशाळेचा समारोप आज झाला, त्याप्रसंगी बोलताना त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, संजय भिसे, पी के इंटरनँशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ काटे, जयनाथ काटे, सकाळचे वरिष्ठ वितरण व्यवस्थापक विनोद पाटील, सहायक व्यवस्थापक सुनिल फलफले यांच्यासह योगशिक्षक प्रशांत पाटील, डॉ वैशाली राजहंस, शैलेंद्र देखमुख, शोभा शुक्ला, शेली शर्मा, कीर्तीका काव्या, सुषमा जगताप, रामकृष्ण पालमकर उपस्थित होते. या उपक्रमासाठी 'सकाळ' माध्यम प्रायोजक आहे. 

दोन दिवसाच्या या शिबिरात योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा याबरोबर तज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने झाली. सौदागरवासिय बरोबर सकाळी सात वाजता जो तो आपापली योगा चटई अथवा कापडी बस्कर घेऊन हजर रहात असे. याचा जेष्ठ नागरिक, नवचैतन्य हास्य क्लबचे सभासद, संगणक अभियंत्यांपासून लहानथोरांनी योगाभ्यास केला. आणि आजच्या समारोप प्रसंगी सर्वांनी वर्षभर योगासने करण्याचा संकल्प केला. 

योगगुरू चुत्तर म्हणाल्या, " अस्थिर मानवी मन भटकत असते, मनात तरंग उमटत असताना नकळत आपण दुसऱ्यांचा मत्सर, राग करीत असतो. तर एखाद्याबद्दल इर्षा भिती आपल्यामध्ये तयार होत असते. परंतु अशा वेळी मनाला ताब्यात ठेवण्याचे काम व मनातील व्याधी मुळापासून काढून टाकण्याचे काम योगाभ्यासातून होते. "

उमा बाडगी यांनी ताडासन, वृक्षासन, पादअंगुष्ठासन ही उभी व वक्रासन, नौकासन, उष्ट्रासन व उत्तानमंडुकासन ही बैठी आसने करून घेतली. गरीमा बलेजा यांनी सेतुबंधासन, द्विपाद उत्तानपादासन व शवासन ही झोपून करावयची आसने घेतली. रोझलँण्ड चे सचिव चंदन चौरासिया व अभय कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. 

4 मार्च 2017 पासून रोझलँण्ड रेसिडेन्सीमध्ये दर शनिवार आणि रविवार सकाळी सात वाजता मोफत योगाभ्यास शिकविला जात आहे. त्यामुळे सौदागरसह पिंपरी चिंचवडवासियांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन सचिव चंदन चौरासिया यांनी केले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com