पिंपळे गुरव येथे योग सप्ताह संपन्न

मिलिंद संधान
सोमवार, 18 जून 2018

नवी सांगवी (पुणे) - येथील ओम नमो: चिकित्सालय व ओम नमो: परिवर्तन परिवार यांचे वतीने योग सप्ताह निमित्त नुकतेच मोफत योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पिंपळे गुरव येथील चिकित्सालयात पार पडलेल्या कार्यक्रम प्रसंगी योगासनांच्या प्रात्यक्षिकासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पितृ दिन साजरा करण्यात आला. 

यावेळी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी 'योग' चे महत्व डॉ वैशाली लोढा यांनी विषद केले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी शारीरिक तंदुरुस्ती आणि जिद्द यावर प्रकाश टाकला.
 
डॉ पवन लोढा यांनी वडीलधाऱ्यांचा आदर, व्यायाम व अभ्यास या त्रिसूत्रीबद्दल सांगितले. प्राध्यापक व कलाकार मंगेश दळवी यांनी स्वतः मधील गुणांना ओळखून त्यांचे जतन करण्यासाठी वेळ द्यायला सांगितले. चित्रकार व शिक्षक सुरेश वरगंट्टीवार यांनी छंद जोपासायला सांगितले तर उद्योजक दिलीप पाटकर, निखिल लुंकड यांनीही मुलांना मार्गदर्शन केले. धनश्री दळवी व सुनीता जाधव यांनी पितृ दिनाचे महत्व पटवून दिले.
 
आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Yoga week was completed at Pimpale Gurav