जगदंबा सरस्वती ‘योगाथॉन’चे रविवारी आयोजन

Yogathon
Yogathon

पुणे - प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयातर्फे रविवारी (ता. २३) ‘जगदंबा सरस्वती योगाथॉन’ आयोजित केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस, ऑलिंपिक दिवस आणि जगदंबा सरस्वती स्मृती दिनानिमित्ताने ही मॅरेथॉन आयोजित केली आहे. मॅरेथॉनची सुरवात सकाळी साडेपाच वाजता पिसोळी येथील ‘जगदंबा भवन मेडिटेशन ॲण्ड रिट्रीट सेंटर’ पासून होणार आहे.

‘सकाळ’ या उपक्रमाचा माध्यम प्रायोजक आहे. १८ ते ५० वयोगटातील धावपटूंसाठी असणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये प्रवेश विनामूल्य आहे. रविवारी पहाटे जगदंबा भवनापासून मॅरेथॉन सुरू होणार आहे. ही मॅरेथॉन ‘एनआयबीएम रस्ता’ ते पुन्हा जगदंबा भवन, अशी साडेअकरा किलोमीटरची धाव पूर्ण करेल. सहभागी धावपटूला टी शर्ट, पदक, प्रमाणपत्र आणि न्याहारी देण्यात येणार आहे. पुरुष आणि महिला गटांसाठी स्वतंत्र विजेते घोषित करण्यात येणार आहे. या मध्ये २१ हजार रुपयांचे प्रथम, १५ हजार रुपयांचे द्वितीय, तर दहा हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. सहभागी होण्यासाठी नागरिकांनी www.jagdambabhawan.org/event/marathon या संकेतस्थळावर नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी ९८२०८५९८८५ आणि ७५६८०४०७६७ या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com