मरणाचं नाटक अन्‌ निशाणा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

पुणे - तापमान उणे २० अंश सेल्सिअस... डोक्‍यावर घोंगावणारं बर्फाळ तुफान... अशात अहोरात्र आणि तासन्‌तास चढाई करत गाठलेलं शिखर... समोर उभी ठाकलेली शत्रूची सशस्त्र फळी आणि शत्रूच्या सैन्याचा उंचावरून सातत्यानं सुरू असलेला हल्ला... जिवंतपणी मरणाचं केलेलं नाटक आणि शत्रू अगदी जवळ आल्यावर संधी साधून त्यावर चढविलेला प्रतिहल्ला...अन्‌ त्यानंतर ‘टायगर हिल’वर कब्जा मिळविल्याचा साजरा होणारा विजयोत्सव... या कारगिल युद्धाच्या आठवणी परमवीर चक्र विजेते सुभेदार योगेंद्रसिंह यादव यांनी जागवल्या.

नाम फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील २० हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख ५० हजार रुपयांचा मदत निधी देण्यात आला. या कार्यक्रमात सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल सुहास जतकर, फाउंडेशनचे संस्थापक आणि अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे उपस्थित होते. या वेळी वीरपत्नी आणि माता यांनीही मनोगत व्यक्त केले. अनासपुरे यांनी सूत्रसंचालन केले.

वर्दी के लिए जान कुर्बान...
‘‘एक सैनिक धर्म, जात या क्षेत्र नहीं देखता, वो सिर्फ अपनी वर्दी के लिए जान कुर्बान करना जानता है’’ असे गौरवोद्गार योगेंद्रसिंह यादव यांनी काढले. ते म्हणाले, ‘‘सैनिकाची शारीरिक आणि मानसिक ताकद कमी झाली की, देशावरील निष्ठा आणि आस्था जागी होते तेव्हा तो खंबीरपणे आव्हानाचा सामना करतो. कारगिल युद्धाच्या वेळी मी अवघ्या १९ वर्षांचा होतो. या युद्धात सहभागी होण्याची संधी मला मिळाली, याचा सार्थ अभिमान आहे.’’ 

Web Title: Yogendra Singh Yadav