प्रजासत्ताक दिनी 'त्याने' माऊंट किलीमंझारोवर फडकवला तिरंगा; पाहा कोण आहे तो?

डॉ. संदेश शहा
Monday, 3 February 2020

भारतीय घटनेतील समता, बंधुता, एकात्मता तसेच सर्वधर्मसमभाव या तत्वांचा जागतिक पातळीवर उदघोष होण्यासाठी त्याने व सहकाऱ्यांनी हा लक्षवेधी उपक्रम राबविला. 

इंदापूर : अतिशय खराब वातावरण, शून्याच्या खाली असणारे तापमान, घोंगावत वाहणारे वारे, उभी चढण तसेच पडणारा बर्फ यावर मात करत करेवाडी ( ता. इंदापूर ) येथील योगेश करे या युवकाने आफ्रिका खंडातील टांझानिया येथील माऊंट किलीमंझारो हे बर्फाच्छादित शिखर सर केले. भारतीय प्रजासत्ताक दिनी 71 फुटाचा तिरंगा ध्वज फडकावत त्याने भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करून विश्व- विक्रम केला. 

No photo description available.भारतीय घटनेतील समता, बंधुता, एकात्मता तसेच सर्वधर्मसमभाव या तत्वांचा जागतिक पातळीवर उदघोष होण्यासाठी त्याने व सहकाऱ्यांनी हा लक्षवेधी उपक्रम राबविला. राज्याचे जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी या यशाबद्दल योगेशचे कौतुक केले.

येत्या 24 तासांत महाराष्ट्रात 'या' ठिकाणी पावसाची शक्यता...

योगेशचे वडील मनोहर हे शेतकरी असून त्याचे संपूर्ण कुटुंब शेतीव्यवसाय करत आहे. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात योगेश एस. वाय. बीएस्सी करत आहे. लहानपणापासून त्याला ट्रेकिंगचा छंद असून राज्यातील सर्वात उंच कळसू -बाई शिखरासह त्याने अनेक दुर्गम किल्ल्यावर यशस्वी चढाई केली आहे. सह्याद्रीच्या निसर्गरम्य वातावरणात त्याला फिरायला तसेच या माध्यमातून नवनवीन संकल्पना युवकापर्यंत पोहोचवणे त्याला आवडते.  कळसूबाई शिखर सर केल्यानंतर त्याने आफ्रिका खंडातील टांझानिया देशातील किलीमंझारो हे शिखर सर करण्याचा निश्चय केला. 

आणखी दोन संशयित रुग्ण नायडू रुग्णालयात दाखल 

सोलापूर येथील ट्रेकर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने मुंबई येथील रोहित पाटील, कोल्हापूर येथील सागर नलवडे तसेच उत्तर प्रदेशातील पोलिस जवान आशिष दीक्षित यांच्यासह त्यांनी मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनल येथून 11 तासाचा विमान प्रवास करून 22 जानेवारीला टांझानिया येथे पोहोचले. त्यानंतर दुपारी 2 वाजता ते सर्व जण किलीमंझारो नॅशनल पार्कला पोहोचले. तेथून चढाई सुरू करून चार दिवसांचा खडतर प्रवास करत ते 25 जानेवारीला शिखराच्या अंतिम बेसकॅम्पला पोहोचले. रात्री 10 वाजता त्यांनी बर्फ पाऊस व थंड हवेचा सामना करत तसेच मायनस 15 डिग्री सेल्सियस तापमानात त्यांनी 26 जानेवारीला सकाळी 9 वाजता या शिखरावर यशस्वी चढाई केली. समुद्रसपाटी पासून 19341 फूट असलेल्या हे शिखर सर केल्यानंतर तिरंगा फडकवल्यानंतर ही मोहीम फत्ते झाली. 

#PuneCrime : तळजाई वसाहतीत ५० गाड्यांची तोडफोड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yogesh Kare completed the icy summit of Mount Kilimanjaro on Republic Day of India