मल्टिप्लेक्‍समध्ये बिनधास्त न्या खाद्यपदार्थ

1Multiplex
1Multiplex

पुणे : मल्टिप्लेक्‍समधील खाद्यपदार्थांच्या भरमसाट भावामुळे प्रेक्षकांना त्याची झळ बसत होती. त्यातच राज्य सरकारने तेथे बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यावर बंदी नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, बंदी घालणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला, त्यामुळे  मल्टिप्लेक्‍समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी दिल्याचे दिसून आले. ‘सकाळ’ने पुण्यातील काही मल्टिप्लेक्‍समध्ये जाऊन नेमकी काय परिस्थिती आहे, याची शनिवारी पाहणी केली. त्यात बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी असल्याचे दिसून आले.

सिटी प्राइड, सातारा रोड : आम्ही घरच्या खाद्यपदार्थांचा डबा हातात घेऊन थिएटरमध्ये प्रवेश केला. मात्र, कर्मचाऱ्यांनी आम्हाला अडवले नाही. मध्यंतरानंतर आम्ही डबा खातानाही कोणी अडवले नाही. त्यात कर्मचाऱ्यांना विचारले असता, चित्रपट रसिकांना खाद्यपदार्थ आणण्यास परवानगी दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, याबाबत अनेकांना माहिती नसल्याचेही दिसून आले.

आर-डेक्कन सिटी प्राइड, डेक्कन : बाहेरील खाद्यपदार्थ न आणता मल्टिप्लेक्‍समधील खाद्यपदार्थ खाण्यावर प्रेक्षकांचा जोर असल्याचे दिसून आले. सकाळची वेळ असल्याने अनेकांनी खाद्यपदार्थ आणण्याचे टाळल्याचे दिसले. मल्टिप्लेक्‍समध्ये खाद्यपदार्थांच्या भरमसाट दराची तक्रार प्रेक्षकांनी केली. सोबतच खाद्यपदार्थसुद्धा अपेक्षेप्रमाणे चांगल्या दर्जाचे नसल्याचे सांगितले.

मल्टिप्लेक्‍समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ आणण्यासंबंधीची याचिका न्यायालयात आहे. हा विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे यावर मत व्यक्त करणे योग्य होणार नाही.  
- दीपक अशर, अध्यक्ष, मल्टिप्लेक्‍स असोसिएशन ऑफ इंडिया

खाद्यपदार्थांचे भाव
खाद्यपदार्थ           भाव (अंदाजे)
पॉपकॉर्न               १००-२००
समोसा ते बर्गर        ६०-१००
थंड पेय                  ८०-१००
गरम पेय                 ६०-८० 

कॉफीत झुरळ !
आर-डेक्कनच्या मल्टिप्लेक्‍समध्ये ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी कॉफी खरेदी केली असता त्यात झुरळ आढळले. खाद्यपदार्थांचे भरमसाट भाव असतानाच स्वच्छतेचा अभाव असल्याचे येथे दिसले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com