तुम्ही खासगी कंपनी स्थापा, आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 September 2020

तुम्ही खासगी कंपनी स्थापन करताय, हा गावांच्या विकासासाठी चांगलाच निर्णय आहे. त्यामुळे हा विषय केवळ पुणे जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता, तो राज्यातील अन्य सर्वच जिल्हा परिषदांननाही अंमलात आणता आले पाहिजे. त्यामुळे तुम्ही बिनधास्त खासगी कंपनी स्थापन करा. आम्ही याबाबत राज्यस्तरावर धोरणात्मक निर्णय घेऊ, असे आश्र्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. ५) पुणे जिल्हा परिषदेला दिले.

पुणे - तुम्ही खासगी कंपनी स्थापन करताय, हा गावांच्या विकासासाठी चांगलाच निर्णय आहे. त्यामुळे हा विषय केवळ पुणे जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता, तो राज्यातील अन्य सर्वच जिल्हा परिषदांननाही अंमलात आणता आले पाहिजे. त्यामुळे तुम्ही बिनधास्त खासगी कंपनी स्थापन करा. आम्ही याबाबत राज्यस्तरावर धोरणात्मक निर्णय घेऊ, असे आश्र्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. ५) पुणे जिल्हा परिषदेला दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या विषयावर मार्ग काढण्यासाठी लवकरच या विषयांशी संबंधित सर्वच जसे ग्रामविकास, महसूल, पर्यावरण, उद्योग उर्जा आदींसह विविध विभागांची संयुक्त बैठक घेतली जाईल, अशी ग्वाहीही पवार यांनी यावेळी दिली.

पत्रकारांच्या विमा संरक्षणाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी दिले संकेत; अधिवेशनात मांडणार मुद्दा

पुणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील गावां-गावांतील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन जिल्हा परिषदेची स्वतंत्र खासगी कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सर्वसाधारण सभेची मंजुरी घेत, हा निर्णय अंतिम केला आहे. मात्र राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्या या ग्रामविकास विभागाच्या अखत्यारित येत आहेत. त्यामुळे या संस्थांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना राज्य सरकारची परवानगी घेणे अनिवार्य आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे.

कोरोनाला आळा घालण्यासाठी शरद पवार मैदानात; पुण्यात घेतल्या बैठकांवर बैठका!​

दरम्यान, पवार यांनी आज पुण्यात जिल्हा परिषदेच्या राज्य सरकारकडील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला. या बैठकीत उपाध्यक्ष रणजित शिवतरे आणि बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी हा मुद्दा पवार यांच्यापुढे उपस्थित केला ‌ अशा पद्धतीचा प्रयत्न करणारी पुणे ही देशातील पहिलीच जिल्हा परिषद असल्याचे शिवतारे यांनी ‌पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.

Breaking : रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; १२ सप्टेंबरपासून धावणार विशेष रेल्वेगाड्या!​

पवार म्हणाले, "हा प्रश्न केवळ पुणे जिल्हा परिषदेचापुरता अन्य जिल्हा परिषदांच्या बाबतीतही निर्माण होणार आहे. त्यामुळे राज्यातील अन्य जिल्हा परिषदांनाही अशी खासगी कंपनी स्थापन करता आली पाहिजे. यासाठी याबाबत लवकरच राज्यस्तरावर धोरणात्मक निर्णय घेतला जाईल."

झेडपीच्या कंपनीचे विश्र्वत कोण असणार?
- मुख्य कार्यकारी अधिकारी.
- अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी.
- जिल्हा परिषद अध्यक्ष.
- जिल्हा परिषद उपाध्यक्ष.
- विषय समित्यांचे सभापती.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: You set up a private company and we will make strategic decisions ajit pawar