आपण फक्त चांगलेच घ्यावे : पंडित बिरजू महाराज (व्हिडिओ)

MATE9757.jpg
MATE9757.jpg

पुणे : सध्या नृत्याच्या नावाखाली वेडेवाकडे काही बघायला मिळते. वेशभूषेबाबत तर काही विचारायलाच नको. रानात औषधासाठी उपयोगी पडणाऱ्या वनस्पती असतात तशी विषारी झुडुपंही असतात. आपल्या सभोवतालच्या जगातून आपण उत्तम असेल ते वेचत जावे, वाईट असेल ते सोडून द्यावे.


रविवारी (ता. १९) गोखलेनगरमधील कलाछाया केंद्रात प्रसिद्ध कथक गुरू पंडित बिरजू महाराज यांच्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यावेळी बालकलावंतांनी कथक नृत्याच्या माध्यमातून 'सुंदर ते ध्यान,' व 'जोहार मायबाप' हे अभंग सादर केले. दोन मोठ्या कलावंतांचा अपवाद वगळता सर्व छोट्या मुलींची ती प्रस्तुती पंडितजी बारकाईने बघत होते. केंद्राच्या प्रमुख व ज्येष्ठ कथक नृत्य कलावंत  प्रभा मराठे यांनी प्रास्ताविक केले. उल्हास पवार यांनी विठोबा व कथकचा देव असलेला कृष्ण हा एकच असल्याचे सांगितले. 
 
यानंतर 'सकाळ'च्या प्रतिनिधीशी बोलताना  पंडित बिरजू महाराज यांनी 'सकाळच्या बालवाचकांसाठी असा सल्ला दिला आहे की, कलेतून आपल्याला बरेच काही साध्य होते. शास्त्रीय नृत्य, संगीत आपल्याला जीवनात उन्नतीकडे नेते. अडथळे अनेक आले तरी डगमगून नका. कलेचा अभ्यास करत राहा. त्यामुळे एकाग्रता वाढते. इच्छाशक्तीतही वाढ होते. नको त्या गोष्टींकडे लक्ष जाऊ नये, याची काळजी घ्या. लोभावणारे सगळेच चांगले नसते. मनोरंजनाच्या साधनांबाबतही सावध राहायला हवे. 

पंडित बिरजू महाराज म्हणाले, " लहानपणापासून माझा ओढा कलेकडे होता. मी फार साधा होतो. आई म्हणायची की, हा किती साधा आहे. आत्तासुद्धा भलत्याच गोष्टींकडे माझे लक्ष जात नाही. माझं सर्वस्व कथक नृत्य हेच आहे. त्यातच मला मनाची शांतता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com