चित्रांतून साकारले गणपती बाप्पा

दीपेश सुराणा  
मंगळवार, 24 जुलै 2018

पिंपरी - युवा चित्रकार म्हणून जडणघडण होत असलेल्या मुंबई-जोगेश्‍वरी येथील शशांक महाडिक याच्या चित्रांतून ‘गणपती बाप्पा’ हे मोहक रूपात साकारले आहेत. चित्रकलेची कोणतीही परीक्षा दिलेली नसताना पेन्सिल स्केचिंगद्वारे आकर्षक व्यक्तिचित्रे काढण्यात त्याचा हातखंडा आहे. 

पिंपरी - युवा चित्रकार म्हणून जडणघडण होत असलेल्या मुंबई-जोगेश्‍वरी येथील शशांक महाडिक याच्या चित्रांतून ‘गणपती बाप्पा’ हे मोहक रूपात साकारले आहेत. चित्रकलेची कोणतीही परीक्षा दिलेली नसताना पेन्सिल स्केचिंगद्वारे आकर्षक व्यक्तिचित्रे काढण्यात त्याचा हातखंडा आहे. 

अवघ्या २३ वर्षांच्या या युवा चित्रकाराचे बीई ॲटोमोबाईलपर्यंत शिक्षण झाले आहे. चित्रकला, कॅलिग्राफी, हस्तकला हे छंद त्याने जोपासले आहे. स्थिरचित्र, निसर्गचित्र आणि व्यक्तिचित्र अशी सुमारे ७० चित्रे त्याने आत्तापर्यंत काढली आहेत. मात्र, त्याचा सर्वाधिक भर हा व्यक्तिचित्रांवर आहे. बालकांच्या विविध भावमुद्रा टिपणारी चित्रे तो लीलया काढतो. त्याचबरोबर, गणपती बाप्पाची विविध चित्रे त्याने चितारली आहेत. सध्या अच्युत पालव, अजित लोटलीकर यांच्या कॅलिग्राफीच्या (सुलेखन) कार्यशाळा, व्हिडिओमुळे त्याला कॅलिग्राफीचे प्रचंड वेड लागले आहे. त्याचाही सराव सुरू आहे.   

शशांक सांगतो, ‘‘लहानपणापासूनच चित्रकला हा माझ्या आवडीचा विषय. शाळेत असल्यापासून रंग, पेन्सिल यांच्याशी गट्टी जमली. मग जमेल तसं, मिळेल तिथे रेखाटत गेलो. बरीचशी चित्रे गणपतीची रेखाटली. चित्रकलेचे खरे बारकावे, कौशल्य शिकविले अ. भि. गोरेगावकर शाळेतील (गोरेगाव) चित्रकलेच्या शिक्षिका भारती राणे यांनी. सातवीत असताना ‘चित्रमय सावरकर’ चित्रकला स्पर्धेत (२००५) पहिल्यांदा बक्षीस मिळालं. चित्र काढण्याचा सराव करताना होणाऱ्या चुकांतून शिकत गेलो. अभियांत्रिकी महाविद्यालयात असताना वेळ काढून चित्र काढण्याचा सराव सुरू ठेवला. इंटरनेट, सोशल मीडियावरून चित्रांचे संदर्भ घेऊन त्यातून शिकत गेलो.’’ 

कुटुंबाची, मित्रांची मिळणारी कौतुकाची थाप ही मला चांगले काम करण्याची प्रेरणा देते. आजही आठवडा, दोन आठवड्यांनी चित्रं काढलं नाही तर अस्वस्थ व्हायला होतं. नुसते चित्रकलेपुरते मर्यादित न राहता मला कला क्षेत्रातही बरेच काही शिकायचे आहे.
- शशांक महाडिक, चित्रकार

Web Title: Young artist shashank mahadik sketch Ganpati Bappa