Pune Crime : पुण्यातील धक्कादायक प्रकार! हॉर्न वाजवल्याने तरूणाकडून कारचालकाला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Pune Crime : पुण्यातील धक्कादायक प्रकार! हॉर्न वाजवल्याने तरूणाकडून कारचालकाला मारहाण

पुणे : कारचालकाने हॉर्न वाजवल्याचा राग आला म्हणून पुण्यातील एका बुलेट दुचाकी चालकाने कारचालकाला जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना खराडी बायपास येथे घडली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पीडित तरूणाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

अधिक माहितीनुसार, सुनील ओमप्रकाश राणा असं मारहाण झालेल्या तरूणाचं नाव असून तक्रारीनुसार राणा हे चिंबळी फाटा येथे कामानिमित्त कारने जात होते. जनक दर्गा परिसरात सिग्नल असल्यामुळे ते थांबले होते.

कारसमोर पांढऱ्या रंगाची बुलेट गाडी होती. तर त्यावर एक तरूणी आणि एक तरूण बसला होता. ती गाडी सारखी मागेपुढे करत असल्यामुळे कारचालकाने हॉर्न वाजवला. बुलेटवर बसलेल्या तरूणीला त्याचा राग आल्याने तिने कारचालकाला शिवीगाळ केली.

त्यानंतर बुलेट चालकाने चारचाकी गाडीचा आरसा काढला आणि कारचालकाला मारहाण केली. या मारहाणीमध्ये कारचालक जबर जखमी झाला असून त्याने याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पण हॉर्न वाजवल्याचा एवढा राग येऊन मारहाणीपर्यंत प्रकरण कसे जाऊ शकते असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Pune Newscrimeviral video