लोणावळ्यातील गिधाड तलावात तरुण बुडाला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

लोणावळा : लोणावळ्याजवळील पर्यटन स्थळ असलेल्या लायन्स पॉईंट जवळील गिधाड तलावात बुडून पुण्यातील तरुणाचा मृत्यू झाला आहे. श्रीराम दुर्ज साहू (वय-२४, मूळ रा. ओरिसा, सध्या रा. सणसवाडी, पुणे) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.
 
श्रीराम साहू आपल्या चार मित्रांसोबत लोणावळा परिसरात वर्षाविहारासाठी आले होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ते सर्व जण लायन्स पॉईंट जवळील गिधाड तलावाजवळ वर्षा विहार करत असताना गिधाड तलावाजवळ असलेल्या धबधब्यात श्रीराम याने उडी मारली. यावेळी तो पाण्यात बुडाला.

मित्रांनी पोलिसांना याबाबत खबर दिल्यानंतर श्रीरामचा मृतदेह पाण्याबरोबर काढला

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Young Boy Fell in Gidhad Lake in Lonavala