पुणे : वाकड फाटयावर भरधाव पीएमपी बसने युवकास चिरडले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

वाकड : डांगे चौका शेजारील वाकड फाटा येथे पुण्याहून चिंचवड गावाकडे येणाऱ्या पीएमपीनेच्या भरधाव येणाऱ्या बस खाली सापडून युवक गंभीर जखमी झाला आहे. 

वाकड : डांगे चौका शेजारील वाकड फाटा येथे पुण्याहून चिंचवड गावाकडे येणाऱ्या पीएमपीनेच्या भरधाव येणाऱ्या बस खाली सापडून युवक गंभीर जखमी झाला आहे. 

दुचाकीवरून रस्ता क्रॉस करणाऱ्या या युवकाला पीएमपीएल बसणे जवळपास 10 ते 12 फूट फरफटत नेले. युवकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

 प्रत्यक्षदर्शी लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार बस चालकाचे वेगावर नियंत्रण नव्हते. अपघात झाल्यानंतर चालकाने बस थांबविण्याचा प्रयत्न केला. बस मधील प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार औंध ओलांडल्यानंतर सदर बस चालक अत्यंत वेगाने गाडी चालवत होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young boy injured in PMP bus accident on Wakad road in pune

टॅग्स