शनिवार वाड्याजवळ तरूणाने पुलावरून मारली उडी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

- आत्महत्येचा प्रयत्न
- शहरातील मध्यवस्तीतील घटना        

पुणे : शहरातील मध्यवस्तीत असलेल्या शनिवारवाड्यासमोरील शिवाजी पुलावरून एका अज्ञात तरुणाने शुक्रवारी (ता. २९) उडी मारली. सध्या तो बेशुद्ध अवस्थेत असून, त्याला उपचारासाठी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी ससून रूग्णालयात दाखल केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी वाचा ई-सकाळचे एप

तरूणाच्या खिशात चिठ्ठी किंवा ओळख पटू शकेल, असा एकही पुरावा सापडला नाही. त्यामुळे त्याचे नाव व पत्ता समजू शकलेला नाही. त्याच्याजवळ केवळ एक पिशवी सापडली असून, त्याद्वारे ओळख पटविण्याचे काम चालू आहे. हा आत्महत्येचा प्रयत्न असण्याची शक्यता असून, त्याबाबतचे कारणही समजू शकले नसल्याचे पोलिस नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young Boy Jump from Shivaji Bridge in Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: