Sat, June 10, 2023

Pune News : संगणक अभियंता तरुणीची आत्महत्या
Published on : 19 March 2023, 2:00 pm
पुणे : एका संगणक अभियंता तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हिंजवडी परिसरात शनिवारी घडली. आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. सायली वासुदेव बट्टे (वय २४, रा. झाशीनगर, गडचिरोली) असे मृत तरुणीचे नाव आहे. घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी आढळली नाही.
तसेच, तिचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिली. सायली ही वर्षभरापासून पुण्यात नोकरीनिमित्त वास्तव्यास होती. सायलीचा भाऊ काही दिवस पुण्यात होता. तो नुकताच गडचिरोलीला गेल्यानंतर ती एकटी राहत होती. शनिवारी (ता. १८) तिने कुटुंबीयांशी संपर्क साधला. परंतु त्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.