त्यांनी बोहल्यावर चढताच घेतला 'हा' निर्णय; भवानी पेठेतील तरुण तरुणीचा आदर्श

hus.jpg
hus.jpg

महर्षीनगर (पुणे) : मानवी मृत्यूनंतर अवयवाचा उपयोग गरजू व्यक्तीला व्हावा ही संकल्पना बऱ्याच जणांना आवडते मात्र प्रत्यक्षात अवयवदान करण्याचा निर्णय घेणारे विरळच असतात. अवयव दानाबद्दल समाजात अनेक अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत. समाजाच्या अनिष्ट रूढीपरंपराना फाटा देत स्वनिर्णयाने एका जोडप्याने अवयव दान करण्याचा धाडसी निर्णय घेत समाजात आदर्श निर्माण केला आहे.

दरम्यान, मोनिश कांबळे (वय २९) असे या उच्चशिक्षित तरुणाचे नाव असून, तो भवानी पेठेतील कासेवाडी भागात राहत आहे. तो मॅकेनिक आहे, तर नेहा बेरे (वय २३) ही सोलापूरची असून, ती देखील उच्चशिक्षित आहे.

लग्न करताना नेहाशी या सर्व गोष्टी सांगूनच लग्न ठरलं असल्याचं मोनिशकडून समजले. या दोघांचा विवाह दिनांक ३१ जुलै रोजी मोजक्या आप्तजणांच्या उपस्थितीत पुलगेट येथे झाला.

ट्रान्सप्लँट कोओर्डीनेटर मोहन फाउंडेशन पुणे सदस्या आणि ससून इस्पितळात डॉक्टर असणाऱ्या प्रतिमा फडतरे यांनी पुढाकार घेऊन अवयवदानाचा फॉर्म भरला. कुटुंबाशी चर्चा करून मोनिश आणि नेहा या दोघा जोडप्यांनी समन्वयाने अवयवदानाचा निर्णय घेतला, हा निर्णय घेतल्यानंतर खरं दडपण हे कुटुंबातून होतं, अवयवदानाचे महत्व समजून सांगितल्यानंतर घरातून पाठींबा मिळाला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विवाह हा फक्त विवाह नसावा त्याला सामाजिक कार्याची जोड हवी तरच आयुष्य सार्थकी लागेल, अस मनोमनी कायम वाटत होतं म्हणून हा निर्णय मी आणि माझ्या होणाऱ्या अर्धागिनीने घेतला असं अवयवदान करणारा तरुण मोनिशने 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.

फडतरे म्हणाले, ''मृत व्यक्ती ज्यांची हृद्यक्रिया बंद पडली आहे, ते नेत्र व त्वचा दान करू शकतात. मात्र ब्रेनडेड रुग्णांमध्ये हृदयक्रिया चालू असल्याने मूत्रपिंड, फुफ्फुसे, यकृत, स्वादुपिंड, हृदय, आतडी यासारख्या प्रमुख अवयवांसोबत नेत्र, त्वचा, हृदयाची झडप आणि कानांचे ड्रम यांचेदेखील दान होऊ शकते. किमान तीन वर्ष व त्याहून अधिक कोणीही अवयवदान करू शकतो. परंतु मृत्यू झाल्यानंतर सहा तासांच्या आतच आपण हॉस्पिटलमध्ये कळवायला हवं.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com