मित्र-मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून युवतीची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suicide

मित्र-मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून एका महाविद्यालयीन युवतीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Pune Crime : मित्र-मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून युवतीची आत्महत्या

पुणे - मित्र-मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून एका महाविद्यालयीन युवतीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. युवतीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून नेमके कारण समोर आले आहे.

हरलीन कौर (वय २१, रा. विमाननगर) असे मृत युवतीचे नाव आहे. या प्रकरणी हरलीनच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यावरून हरलीनचा मित्र आणि मैत्रीणीच्या विरोधात विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरलीन एका हॉटेल व्यवस्थापन महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिने एक फेब्रुवारी रोजी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर कौर कुटुंबीय हे धार्मिक विधीसाठी अमृतसरला गेले होते. पुण्यात परतल्यानंतर आईने हरलीनची वही आणि पुस्तके उघडून पाहिली. तेव्हा हरलीनच्या वहीत आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. याबाबत हरलीनच्या आईने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.