रेल्वेखाली सापडून तरुणीचा मृत्यू

संदीप घिसे 
सोमवार, 9 जुलै 2018

पिंपरी (पुणे) : धावत्या रेल्वेखाली सापडून एका अनोळखी तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना बेगडेवाडी येथे सोमवारी पहाटे घडली.

सहाय्यक उपनिरीक्षक पुरुषोत्तम कर्दळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास धावत्या रेल्वेखाली सापडून एका अनोळखी महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचे वय अंदाजे पंचवीस वर्षे असून वर्ण गव्हाळ, उंची पाच फूट दोन इंच आहे. तिने अंगामध्ये गुलाबी रंगाचा स्वेटर, निळा टॉप त्यावर फुलपाखरांचे चित्र आणि लाल रंगाची पँट असा वेश परिधान केला आहे. या तरूणीबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी देहूरोड रेल्वे पोलीस चौकीशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: young girl died under the railway