दुचाकीवरील तरुणीचा ट्रकच्या धडकेने मृत्यू 

दुचाकीवरील तरुणीचा ट्रकच्या धडकेने मृत्यू 

पुणे : हडपसरहून मुंढव्याकडे जाणाऱ्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सव्वासात वाजता मुंढवा उड्डाण पुलावर घडली. 

प्राची सतीश भुजबळ (वय 22, रा. ऍमनोरा पार्क टाऊन, हडपसर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिची मैत्रीण श्रुतिका शिंदे (वय 20, रा. हडपसर) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राची व श्रुतिका या दोघी दुचाकीवरून हडपसरहून मुंढव्याच्या दिशेने जात होत्या. सव्वासातच्या सुमारास त्यांची दुचाकी मुंढवा उड्डाण पुलावर आली. त्या वेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने फिर्यादी यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे पाठीमागे बसलेली प्राची खाली पडून तिच्या डोक्‍यावरून ट्रकचे चाक गेले. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com