धायरीत तरुणीवर अत्याचार करून खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

पुणे - धायरीतील गारमाळ परिसरात एका तरुणीवर अत्याचार करून खून करण्यात आला. वैष्णवी भोसले (वय १७, रा. गारमाळ, धायरी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.  

सिंहगड पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील गारमाळ भागात गुरुवारी सायंकाळी एका १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह असल्याची माहिती सिंहगड पोलिसांना मिळाली. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला. त्या अहवालामध्ये लैंगिक अत्याचार करून गळा दाबून खून करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

तरुणीचे आई व वडील मजुरीचे काम करतात. ते दोघेही गुरुवारी कामावर गेले तेव्हा वैष्णवी घरी होती. संध्याकाळी आई-वडील घरी आल्यानंतर वैष्णवी घरात बेशुद्धावस्थेत आढळली. तिला उपचारासाठी रुग्णलयात दाखल केले, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

जुन्या भांडणातून तरुणाचा खून
सराईत गुन्हेगाराने जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर कोयत्याने वार करुन खून केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. आंबेगाव पठार येथील एका इमारतीच्या
प्रवेशद्वारासमोर ही घटना घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विनायक मारुती पवार (वय २३, रा. शनिनगर, कात्रज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गणेश मारुती शिर्के (वय २७, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) याने फिर्याद दिली. त्यावरून गणेश गायकवाड, विशाल कांबळे, प्रकाश रेणुसे, बाळा शेडकर, गौरव ऊर्फ गोग्या भामरे (सर्व रा. चव्हाणनगर, शंकर महाराज वसाहत, धनकवडी) यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: young Girl Raped And Murdered In pune