आयटी कंपनीतील तरूणीची आत्महत्या

रवींद्र जगधने
मंगळवार, 22 मे 2018

हिंजवडीतील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या 23 वर्षीय तरूणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता.21) रात्री घडली. पुजा नागनाथ वाघमारे (वय 23, रा. मारूंजी, कोळतेपाटील गेट शेजारी, ता. मळशी. जि. पुणे, मुळ रा. सोलापुर) असे त्या तरूणीचे नाव आहे.

पिंपरी (पुणे) - हिंजवडीतील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या 23 वर्षीय तरूणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता.21) रात्री घडली. पुजा नागनाथ वाघमारे (वय 23, रा. मारूंजी, कोळतेपाटील गेट शेजारी, ता. मळशी. जि. पुणे, मुळ रा. सोलापुर) असे त्या तरूणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत पुजा ही मैत्रीणीसोबत भाड्याच्या घरात राहत होती. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घरात कोणीही नसताना तिने गळफास लाऊन घेतला. हे तिच्या मैत्रीणींनी पाहताच त्यांनी तिला उपचारासाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात दाखल केले. मात्र, रात्री दिडच्या सुमारास डॉक्टरांनी तीला उपचारापुर्वीच मृत घोषित केले. दरम्यान याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी अकस्मात मृत्यची नोंद केली आहे.

Web Title: young girl suicide in pimpari pune